एक्स्प्लोर

Sapota For Health : चिकू खाल्ल्याने मिळते झटपट एनर्जी, अशक्तपणा दूर होण्याबरोबरच शरीराला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे

Sapota For Health : चिकू हे एक असे फळ आहे जे स्वतःमध्ये पोषक तत्वांचा खजिना आहे. रोज चिकू खाल्ल्याने त्वचा, मन आणि पचनक्रिया चांगली राहते. चिकू कमजोरी दूर करण्यासही मदत करते.

Benefits Of Sapota (Chiku) : चिकू हे असे फळ आहे जे बटाट्यासारखे दिसते, परंतु चवीने परिपूर्ण असते. लोकांना चिकूची गोड आणि दाणेदार चव आवडते. चिकूला लोक सपोटा या नावानेही ओळखतात. चिकू खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. याच्या सेवनाने अशक्तपणा दूर होतो आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. चिकू हे केवळ फळच नाही, तर त्याचे झाड आणि पानांचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. चणामध्ये भरपूर पोषक असतात. चिकूमध्ये व्हिटॅमिन-बी, सी, ई आणि पोटॅशियम, मॅंगनीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म चांगल्या प्रमाणात आढळतात. चिकूची पाने, मूळ आणि साल यांचा अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. चिकू खाल्ल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोकाही कमी होतो. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठीही चिकू हे एक चांगले फळ आहे. चिकू पोटासाठीही खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या चिकूचे फायदे.

चिकूचे फायदे :

1- झटपट ऊर्जा - चिकू खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. रोज चिकू खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो. यामध्ये कार्बोहायड्रेट आढळते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. ज्यांची ऊर्जा कमी आहे त्यांच्यासाठी चिकू हा चांगला स्त्रोत आहे. 

2 - वजन कमी करण्यास मदत - चिकू खाल्ल्याने मेटाबॉलिज्म चांगले राहते. चिकू खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे भूक कमी लागते आणि वजन सहज कमी करता येते.

3 - कॅन्सरचा धोका कमी होतो - चिकूमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म चांगल्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी चिकू आणि त्याच्या फुलांचा अर्क फायदेशीर मानला जातो. चिकूच्या मिथेनॉलिक अर्कामध्ये कर्करोगाच्या ट्यूमरची वाढ थांबवण्याचे गुणधर्म आहेत. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. 
 
4 - पचनशक्ती मजबूत होते - चिकू खाल्ल्याने अन्ननलिका फुगणे, पोटात गॅस, पोटदुखी यांसारख्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते. यात टॅनिनचे दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा देखील निरोगी होते. चिकूमध्ये व्हिटॅमिन ई, सी आणि व्हिटॅमिन ए आढळते जे त्वचेसाठी फायदेशीर आहे.
 
5 - मन निरोगी राहते - चिकू खाल्ल्याने निद्रानाश, नैराश्य आणि तणावाची समस्या कमी होते. चिकूमध्ये आढळणारे घटक मेंदूला पुरेसा ऑक्सिजन पोहोचविण्यास मदत करतात. यामुळे मन निरोगी राहते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP MajhaNitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषणTeam India Felicitation in Vidhan Bhavan : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
Embed widget