Sarva Pitri Amavasya 2023: सर्वपित्री आणि शनिश्चरी अमावस्येला सूर्यग्रहण, श्राद्ध करता येईल की नाही? जाणून घ्या
Sarva Pitri Amavasya 2023 : 14 ऑक्टोबर हा विशेष दिवस आहे. या दिवशी सर्वपित्री अमावस्या, सूर्यग्रहण आणि शनिश्चरी अमावस्या एकत्र येत आहेत. ग्रहण असल्यामुळे या दिवशी श्राद्ध करावे की नाही? जाणून घ्या

Sarva Pitri Amavasya 2023 : भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या हा श्राद्ध पक्षाचा (Pitru Paksha 2023) शेवटचा दिवस आहे, 2023 मधील उदयतिथीनुसार, यावेळी ही तारीख 14 ऑक्टोबर रोजी येत आहे. हा दिवस शनिवार असल्याने या दिवसाला शनिश्चरी अमावस्या असेही म्हटले जाईल. 14 ऑक्टोबर हा विशेष दिवस आहे. या दिवशी सर्वपित्री अमावस्या, सूर्यग्रहण आणि शनिश्चरी अमावस्या एकत्र येत आहेत. ग्रहण असल्यामुळे या दिवशी श्राद्ध करावे की नाही? जाणून घ्या
सूर्यग्रहण भारतात दिसणार का?
या दिवशी म्हणजेच शनिवार, 14 ऑक्टोबर रोजी वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहणही होत आहे. सूर्यग्रहण रात्री 8.34 ते पहाटे 2.25 पर्यंत राहील. हे ग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे या ग्रहणाचा सुतक कालावधीही वैध राहणार नाही. पितृ पक्षातील अमावास्येला होणार्या सूर्यग्रहणाचा श्राद्धविधीवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्रहणकाळात श्राद्ध करणे शुभ ठरते असे मानले जाते.
पूर्वज होतील प्रसन्न
सुतक काळात किंवा ग्रहणाच्या वेळी पितरांचे श्राद्ध, तर्पण विधी आणि पितरांच्या नावाने दान केल्याने पितृदोष नाहीसा होतो आणि पितरांचे तसेच देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने श्राद्ध केले जाते. त्याचप्रमाणे तुम्ही कोणतीही भीती न बाळगता श्राद्ध करू शकता.
सर्वपित्री अमावस्येला या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
जेवणात खीरपुरी असणे आवश्यक आहे.
दुपारी श्राद्ध करावे.
या दिवशी पंचबली (गाय, कुत्री, कावळे, देव आणि मुंग्या) अर्पण करा आणि हवन करा.
या दिवशी ब्राह्मणाला भक्तिभावाने अन्नदान करावे.
ब्राह्मणाला दक्षिणा देऊन निरोप द्या.
शनि अमावस्येला काय करावे?
या वेळी, 14 ऑक्टोबर रोजी येणार्या शनिश्चरी अमावस्याचे महत्त्व अनेक पटींनी मोठे आहे. कारण ती सर्वपित्री अमावस्येला येत आहे. या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने तुमच्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. जर तुम्ही शनि साडेसाती आणि शनी ढैय्याच्या प्रभावाखाली असाल तर ते कमी होते.
आपल्या पूर्वजांना निरोप असा द्या
पितृपक्षाची समाप्ती सर्वपित्री अमावस्या तिथीला होते. या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे. पिंपळाच्या झाडाला पितरांचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. या दिवशी पितरांसाठी काळ्या तिळासह जल अर्पण करा, यामुळे घरामध्ये पितरांचा आशीर्वाद कायम राहील. पितरांना दूध, तीळ, कुशा, फुले आणि सुगंध मिसळलेले पाणी अर्पण करावे. असे मानले जाते की, जल अर्पण केल्याने पितरांची तहान भागते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
Sarva Pitri Amavasya 2023 : यंदा सर्वपित्री अमावस्येला दुर्मिळ योगायोग, पितरांचा आशीर्वाद कायम राहील, 'हे' उपाय करा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
