एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
आकाशात सुपरमूनचे दर्शन, 13 टक्के मोठा, 30 टक्के तेजस्वी; पंगांगकर्ते सोमण नेमकं काय म्हणाले?
त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री म्हणजेच आज बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी आकाशात आपणा सर्वांना सुपरमून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.
supermoon in sky today soman
1/7

त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री म्हणजेच आज बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी आकाशात आपणा सर्वांना सुपरमून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.
2/7

याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ असेल तर चंद्रबिंब जास्त मोठे आणि जास्त तेजस्वी मनोहारी दिसते. तसे ते बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी रात्री दिसणार आहे.
3/7

चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किमी. अंतरावर असते. या दिवशी तो पृथ्वीपासून ३ लक्ष ५६ हजार ८३४ किमी. अंतरावर येणार आहे.
4/7

पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान आणि कमी तेजस्वी दिसते, याला मायक्रो मून म्हणतात. सुपर मून हा मायक्रो मूनपेक्षा १३ टक्के मोठा आणि ३० टक्के जास्त तेजस्वी दिसतो.
5/7

तसा तो बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी रात्री दिसणार आहे. बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी सुपर मून सायं. ५-४४ वाजता पूर्वेला उगवेल आणि रात्रभर आपणास सुंदर दर्शन देईल.
6/7

या पुढील सुपर मून पुढच्याच महिन्यात गुरूवार 4 डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या रात्री आपणास दिसणार असल्याचे दा.कृ.सोमण यांनी सांगितले.
7/7

दरम्यान, आज सर्वत्र देवदिवाळी साजरी होत असताना धार्मिक स्थळांवर दिव्यांची उजळण केली जात आहे. मंदिरात भाविकांची गर्दी होत असून आता सुपरमून देखील पाहण्यासाठी सर्वजण उत्साहित आहेत.
Published at : 05 Nov 2025 08:39 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























