Relationship Tips : तुमच्या चांगल्या वागण्याचा लोक फायदा घेतात? हीच ती वेळ आहे स्वत:मध्ये बदल करा, 5 टिप्स जाणून घ्या
Relationship Tips : तुम्हाला असे सतत वाटते? की लोक तुमचा गैरफायदा घेतात. प्रत्येक गोष्टीत आपण सहज उपलब्ध असल्याने लोकांना त्याची किंमत राहत नाही. अशी परिस्थिती टाळण्यासाठी 5 टिप्स जाणून घ्या
Relationship Tips : कधी कधी असं वाटतं की आपल्या चांगल्या वागण्याचा फायदा लोक घेत आहे. प्रत्येक गोष्टीत आपण सहज उपलब्ध असल्याने लोकांना त्याची किंमत राहत नाही. काही जण नातेसंबंधाना इतकं महत्व देतात की त्यांना हेही कळत नाही की लोक त्याचा गैरफायदा घेत आहे. पण एक वेळ अशी येते जेव्हा वाटते लोक तुम्हाला प्रोत्साहन देत नाहीत किंवा त्यांच्या जीवनात तुमचे महत्त्व कमी झाले आहे, जोडीदार तुमच्यावर तितकं प्रेम करत नाही जेवढे तुम्ही त्याच्यावर करता किंवा नात्याच्या सुरुवातीला तो तुम्हाला महत्त्व देत असे पण कालांतराने त्याने तुमच्याकडे लक्ष देणे बंद केले आहे. आता हे नाते फक्त एकतर्फी झाले आहे, आता जे लोक तुमच्याशी जोडले गेले आहेत, ते फक्त त्यांच्याकडून काम करून घेतात. जर तुमच्यासोबत असे घडत असेल तर स्वतःमध्ये काही बदल करा, जेणेकरून लोक तुमची कदर करतील. जर लोक तुम्हाला गृहीत धरत असतील तर तुमच्या व्यक्तिमत्त्वातून या 5 गोष्टी कायमच्या काढून टाका..
स्वतःसाठी बोलायला शिका..
जर तुम्हाला गृहीत धरायचे नसेल, तर तुमच्या नात्यात काही सीमा आधीच सेट करा की तुम्ही अशा गोष्टी सहन करणार नाही. जर कोणी तुमचे काही चुकीचे केले असेल तर तुम्ही ते सहन करणार नाही. स्वतःसाठी बोला, लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका.
न मागता कोणालाही मदत करू नका
न मागता कोणाला मदत करू नये, कारण न मागता मदत केल्याने ती मदत त्या व्यक्तीला कळत नाही. म्हणून, जेव्हा एखाद्याला तुमची गरज नसते तेव्हा त्याला मदत करू नका. प्रत्येकासाठी सतत उपलब्ध राहणे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. इतरांना स्वतःसमोर ठेवण्याचा तुमचा स्वभाव तुमच्याकडून नवीन संधी हिरावून घेऊ शकतो.
प्रत्येकाशी तुमच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल बोलू नका
तुम्ही तुमचे मन सर्वांसोबत शेअर करू शकत नाही, कारण प्रत्येक व्यक्ती तितका चांगला असू शकत नाही. समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यातून तुमची कमजोरी कळू शकते. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक गोष्टी सर्वांसोबत शेअर करू नका.
प्रत्येकाच्या सल्ल्याचे पालन करू नका.
प्रत्येकाचे म्हणणे ऐकू नका. कराण असे करणे योग्य नाही, परंतु तसे करण्याचा प्रयत्न केल्यास तुमचे व्यक्तिमत्त्व कमी आकर्षक दिसते. तुम्ही सर्वांचे ऐका, तुमच्या मनाचे अनुसरण करा, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या कल्पना स्पष्टपणे मांडा. स्वतःचा आदर करायला शिका, तरच लोक तुमचा आदर करतील.
कोणाचेही डोअर मॅट बनू नका
नेहमी कोणाची तरी वाट पाहू नका. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचे महत्त्व कमी होते. तो तुम्हाला गृहीत धरू लागतो. हे काम आपले आहे आणि आपल्याला दुसरे काही करायचे नाही असे त्याला वाटते. अशा नात्यात ती व्यक्ती काही गोष्टींबाबत तुमच्यावर वर्चस्व गाजवू लागते. म्हणून, एखाद्याचे डोअर मॅट बनणे टाळा आणि लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका.
स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा
स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा आणि जास्तीत जास्त लोकांसमोर व्यक्त व्हा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या भावना सगळ्यांशी शेअर करा. स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही लोकांशी बोलले पाहिजे परंतु प्रत्येकाशी भावनिक जोडून घेऊ नका. वरील सर्व टिप्स लोकांना तुमचा गैरफायदा घेण्यापासून प्रतिबंधित करेल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Relationship Tips : नात्यात जोडीदाराचा खरा चेहरा काही मिनिटांतच कळेल, फक्त या गोष्टींकडे गुपचूप लक्ष द्या, सत्य समोर येईल