Omicron Variant : सावधान! मास्कशिवाय बाहेर फिरण्याची चूक पडेल महागात
Covid-19 Omicron Variant : कोरोना महामारीमुळे (Coronavirus) जगभरात चिंतेचं वातावरण आहे. कोरोना रुग्णांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे.
Covid-19 Omicron Variant : कोरोना महामारीमुळे (Coronavirus) जगभरात चिंतेचं वातावरण आहे. कोरोना रुग्णांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे (Omicron Variant) रुग्णांची संख्या आणखी वाढू लागली. इतर व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरियंट जास्त संसर्गजन्य आहे. डेल्टाच्या तुलनेत कमी प्रभावी असला तरी जा वेगाने पसरतो. ज्यांनी कोरोना लस घेतली नाही, अशा लोकांना ओमायक्रॉन व्हेरियंटचा अधिक धोका आहे. सौम्य लक्षणामुळे लोकांनी ओमायक्रॉन व्हेरियंटकडे दुर्लक्ष केलं असून कोरोना नियमांचा फज्जा उडवला आहे. त्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ओमायक्रॉनपासू वाचण्यासाठी काय करायला हवे, याबाबत जाणून घेणार आहोत.
लसीकरण न करणाऱ्यांनी काय करावे -
कोरोनाविरोधात लढण्यासाठी लसीकरण महत्वाचं आहे. जर अद्याप लसीकरण केलं नसेल तर लवकर लस टोचून घ्या. ओमयाक्रॉनची लक्षणे गंभीर नसली तरी याला हलक्यात घेऊन चालणार नाही. ज्यांनी लसीकरण घेतलं नाही, अशांना ओमायक्रॉनची लागण लगेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरण लगेच करुन घ्या.
श्वसनाचा त्रास असणाऱ्यांनाही त्रास -
ज्या लोकांना श्वसनाचा त्रास आहे, अशांनी तात्काळ लसीकऱण करुन घ्यावं. श्वसनाचा त्रास अथवा अस्थमा असणाऱ्यांनी जास्त काळजी घ्यावी, कारण अशा लोकांना ओमायक्रॉन होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे श्वसनाचा त्रास असणाऱ्यांनी अथवा अस्थमा असणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती -
ज्यांची कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आहे, त्यांना ओमायक्रॉनचा अधिक धोका आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करा.
ओमायक्रॉनचा कसा सामना कराल-
ओमायक्रॉन अथवा कोरोनाला रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करा. मास्कचा नियमीत वापर करा. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. लसीकरण केलं नसेल तर तात्काळ लस घ्या. अशा पद्धतीने ओमायक्रॉनपासून स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवू शकता.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live