एक्स्प्लोर
Advertisement
Mother's Day 2020 : मातृदिन... कधी आणि का साजरा केला जातो?
जगभरात मातृदिन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यंदा Mother’s Day 10 मे रोजी आहे.
मुंबई : आई म्हणजे सहवास, आई म्हणजे नाव, गाव, आई म्हणजे आयुष्याची शिदोरी... इतर वेळी आई हा विषय आपण आपल्या सर्वसामान्य जगण्यात इतका गृहित धरलेला असतो की, त्याची वेगळी अशी दखलही आपल्याला घ्यावी वाटत नाही. अर्थात हे निरिक्षण सर्वांनाच लागू पडते असे नाही. आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची, कष्टाची, नि:स्वार्थी प्रेमाची आपण आपल्या उभ्या आयुष्यात कधीच परतफेड करु शकणार नाही. मात्र तरीही तिने आपल्याला दिलेल्या ह्या सुंदर आयुष्याबद्दल तिचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे मातृदिन (Mother's Day). जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यंदाही हा दिवस महाराष्ट्र, देश आणि जगभरात साजरा केला जाईल. याच मातृदिनाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया.
मातृदिन (Mother’s Day) म्हणजे काय?
जगभरातील प्रत्येक आईबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी, इतरांसाठी सतत कष्ट करणाऱ्या प्रत्येक आईचे आभार मानण्यासाठी साजरा केला जाणार दिवस म्हणजे मातृदिन.
कशी झाली मातृदिन (Mother’s Day) साजरा करण्याची सुरुवात?
मातृत्वदिन साजरा करण्याती पहिली सुरुवात अमेरिकेतून झाली. अमेरिकन अॅक्टिविस्ट अॅना जार्विस (Anna Jarvis) यांचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम करत होतं. त्यांनी स्वतः लग्न केलं नव्हतं. ती सदैव आपल्या आईसोबतच राहात असे. जिवलग आईचा मृत्यू झाल्यावर अॅना जार्विस हिने आईच्या स्मृतिप्रित्यार्थ मातृदिन साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू अनेक देशांमध्ये मातृदिन साजरा करण्यात येऊ लागला.
मातृदिन (Mother’s Day) कधी साजरा केला जातो?
जगभरात साजरे केले जाणारे विविध दिवस हे विशिष्ठ तारखेला असतात. पण, मदर्स डेचे वैशिष्ट्य असे की, हा दिवस साजरा करण्यासाठी कोणतीच तारीख कधीही नक्की ठरलेली नसते. 10 मे 1914 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला होता. ज्यामध्ये असं लिहिण्यात आलं होतं की, मे महिनाच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्यात येईल. तेव्हापासून भारत आणि इतर देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जाऊ लागला. यंदा Mother’s Day 10 मे रोजी आहे.
कसा साजरा केला जातो मातृदिन (Mother’s Day) ?
प्रत्येक जऩ मातृदिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. तसं बघालयला गेलं तर आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या खआस दिवसाची गरज नसते. पण मातृदिनाच्या दिवशी आईवरील प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस असतो. यावेळी काही लोक आर्थिक रुपात, वस्तू रुपात किंवा कामात मदत करुन आईवरी आपले प्रेम व्यक्त करतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement