Mini Cloths Dryer : आता तुमचे कपडे काही मिनिटांतच सुकतील; बॅगेत भरून कुठेही नेऊ शकता; 'हे' आहे खास मशीन
Mini Cloths Dryer : ह्या ड्रायरमध्ये तुम्हाला ट्यूब मोड देखील मिळतो, ज्यामध्ये तुम्ही शूज, मोजे, कपडे, बेड इत्यादी काही मिनिटांत सोप्प्या पद्धतीने सुकवू शकता.
![Mini Cloths Dryer : आता तुमचे कपडे काही मिनिटांतच सुकतील; बॅगेत भरून कुठेही नेऊ शकता; 'हे' आहे खास मशीन Mini Cloths Dryer under 5000 amazon discount and offers marathi news Mini Cloths Dryer : आता तुमचे कपडे काही मिनिटांतच सुकतील; बॅगेत भरून कुठेही नेऊ शकता; 'हे' आहे खास मशीन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/e101db89bf14b38512fcc878ca7883ff1707484112353358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mini Cloths Dryer : बदलत्या हवामानामुळे आजकाल कपडे सुकवणं फार कठीण झालं आहे. कधी जास्त ऊन तर कधी वारा आणि पावसामुळे घरातील कपडे सुकवायचे कसे असा घरच्या गृहिणींना प्रश्न पडतो. अशा परिस्थितीत कपडे सुकविण्यासाठी तुम्ही वॉशिंग मशीनचा वापर करू शकता. पण जेव्हा तुम्हाला बाहेर कुठेही फिरायला जायचं असेल किंवा हिल स्टेशनवर जायचं असेल तेव्हा मात्र अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत, कपडे ओले झाल्यास सुकवणे कठीण होते. पण, आता तुम्हाला त्यासाठी तुम्हाला चिंता करावी लागणार नाही. कारण तुम्ही आता मिनी ड्रायरच्या साहाय्याने तुम्ही तुमचे कपडे अवघ्या काही मिनिटांत सुकवू शकता.
Auslese पोर्टेबल कपडे मिनी ड्रायर
ह्या ड्रायरमध्ये तुम्हाला ट्यूब मोड देखील मिळतो, ज्यामध्ये तुम्ही शूज, मोजे, कपडे, बेड इत्यादी काही मिनिटांत सोप्प्या पद्धतीने सुकवू शकता. या पोर्टेबल उपकरणात 400W च्या पॉवरसह येतात. जरी त्याची मूळ किंमत 8,999 रुपये आहे, परंतु तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून 50 टक्के सूट देऊन फक्त 4,480 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
AVIRA इलेक्ट्रिक पोर्टेबल क्लॉथ ड्रायर
ह्या ड्रायरमध्ये जास्त जागा घेत नाहीत, परंतु तुम्हाला त्यांना पिशवीत भरून कुठेही नेऊ शकता. यामध्ये तुम्हाला रॅपिड ड्रॉइंग तंत्रज्ञान मिळतो. जरी त्याची मूळ किंमत 11,999 रुपये आहे, परंतु तुम्ही केवळ 7,799 रुपयांमध्ये 35 टक्के सूट देऊन खरेदी करू शकता.
220V इलेक्ट्रिक पोर्टेबल ड्रायर
ह्या 250W ड्रायिंग पॉवरसह येतो, ज्यामध्ये तुम्ही कपडे झटकून लवकर सुकवू शकता. प्रवासातही तुम्ही ते सोबत घेऊन जाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही तो वापरू शकता.
Xpressdryr Aurate Pro Max पोर्टेबल
या ड्रायरमध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळत आहेत. यामध्ये तुम्ही तुमच्या बाळाचे कपडे आरामात सुकवू शकता. या गॅझेटची मूळ किंमत 8,555 रुपये असली तरी तुम्ही ते 44 टक्के सूट देऊन केवळ 4,799 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
महिंद्रा XUV300 आणि XUV400 वर या महिन्यात मिळतेय भरघोस सूट; 4.2 लाख रुपयांपर्यंतची होईल मोठी बचत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)