एक्स्प्लोर
मेक्सिकोतील एका महिलेची व्हेल माशासोबत मैत्री
मुंबई : मैत्रीला जसं वयाचं बंधन नसतं, तसंच व्यक्तीचंही बंधन नसतं. तुम्ही मांजर, कुत्रा किंवा डॉल्फिन अशा प्राण्यांसोबतही मैत्री करु शकता. पण मेक्सिकोत एका महिलेची चक्क व्हेल माशासोबत मैत्री झाली आहे. या मैत्रीचा व्हिडिओ मेक्सिकोत राहणाऱ्या एयुरोरा या महिलेनं फेसबुकवर टाकला आहे.
एयुरोरा दरवर्षी आपल्या मैत्रिणींना घेऊन कॅलिफोर्नियाच्या समुद्र सफारीवर जाते. तिथेच व्हेल माशासोबत तिची चांगली मैत्री झाली आहे. ही मादी व्हेल आणि तिचं पिल्लू एयुरोराचा पाठलाग करत समुद्राच्या एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत येऊ लागलं.
एयुरोराने शेअर केलेल्या व्हिडीओत ती आणि तिच्या मैत्रिणी व्हेल माशाच्या अंगावरुन प्रेमाने हात फिरवतात, तेव्हा ते आनंदाने पाण्यात डुंबत आहेत. भावनांनी ओतप्रोत असलेल्या या व्हिडिओला लाखो लोकांनी लाईक केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement