Lemon Facepack : पिंपल्स आलेत? वापरा लिंबाचे फेसपॅक्स, जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत
Lemon Facepack : केमिकल्स असणारे ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्यानं चेहऱ्यावर रॅश येतात.
Lemon Facepack : धूळ, माती आणि प्रदूषणामुळे त्वचा खराब होते. त्वचेवरील पिंपल्स आणि डाग घालवण्यासाठी अनेक लोक केमिकल्स असणाऱ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण केमिकल्स असणारे ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्यानं चेहऱ्यावर रॅश येतात. चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी घरीगुती उपाय तुम्ही ट्राय करु शकता. तुम्ही लिंबापासून तयार केलेला फेसपॅक वापरु शकता. जाणून घेऊया लिंबूपासून फेस पॅक तयार करण्याची पद्धत...
दही आणि लिंबूपासून तयार केलेला फेसपॅक
चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर तुम्ही दही आणि लिंबू यांच्यापासून तयार केलेले फेसपॅक चेहऱ्याला लावू शकता. हा फेसपॅक तयार करण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि दोन चमचे दही घ्या. हे दोन्ही मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. हा पॅक चेहऱ्यावर वीस मिनीटं लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा. या पॅकमुळे चेहऱ्यावरील एक्स्ट्रा ऑइल निघून जाते. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावर ग्लो देखील येतो.
लिंबू आणि बेसनाचा फेसपॅक
लिंबू आणि बेसनाचा फेसपॅक तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि तीन चमचे बेसन घ्या. यामध्ये थोडं पाणी देखील मिक्स करा. हा पॅक दहा मिनीट चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. या पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात.
तुमची स्किन जर ऑइली किंवा ड्राय असेल तर तुम्ही हे फेस पॅक्स लावू शकता. पण जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा पॅक लावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
वाचा सविस्तर बातमी: