(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health tips : तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे; जाणून घ्या वैज्ञानिक तथ्य
Health Care : तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया-
Copper Vessel : बहुतेक लोक पूजा विधीसाठी तांब्याच्या भांड्याचा वापर करतात. पण, तांब्याचे भांडे (Copper Vessel) फक्त पूजेसाठीच चांगले मानले जात नाही तर, आरोग्याच्या दृष्टीनेदेखील फायदेशीर मानले जाते. यासाठीच ज्येष्ठ व्यक्तींना तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते. तसेच, वजन कमी करण्यातही तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे प्रभावी मानले जाते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे :
1. पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत : पचनक्रिया चांगली राहण्यासाठी तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी पिऊ शकता. हे पोटातील जीवाणूजन्य संसर्ग नष्ट करण्यात मदत करतात. यासोबतच अपचन, अल्सर यांसारख्या समस्याही यामुळे कमी होऊ शकतात.
2. त्वचेच्या समस्यांपासून सुटका : तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने त्वचेशी संबंधित समस्या कमी होतात. त्यामुळे त्वचेच्या संसर्गापासून आराम मिळतो.
3. वजन कमी करण्यास मदत : शरीराच्या वाढत्या वजनामुळे तुम्ही त्रस्त असाल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते. हे पचन सुधारून वजन कमी करण्यात प्रभावी आहे.
4. कर्करोगाशी लढण्यासाठी प्रभावी : तांब्यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे तुम्हाला कर्करोगाशी लढण्यास मदत करू शकतात. त्याच्या भांड्यांमध्ये पाणी प्यायल्याने मुक्त रॅडिकल्स वाढण्यापासून रोखू शकतात.
5. अॅनिमियाची समस्या दूर : तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्यास शरीरातील अशक्तपणाची समस्या दूर होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :