(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kumkum Bhindi : काय सांगता? हिरवी भेंडी नाहीतर 'कुमकुम भेंडी'; आरोग्यासाठी अधिक फायदेशीर
हिरव्या रंगाची भेंडी तुम्हाला माहित असेल. पण लाल रंगाच्या ‘कुमकुम भेंडी’ बद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का?
Kumkum Bhindi : भेडींची भाजी खायला अनेकांना आवडते. मसाला भेंडी, भेंडी फ्राय अशा प्रकारचे पदार्थ अनेक लोक आवडीने खातात. हिरव्या रंगाचा भेंडी तुम्हाला माहित असेल. पण लाल रंगाच्या ‘कुमकुम भेंडी’ बद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का? जाणून घ्या या हटके भेंडीचे फायदे-
लाल भेडींला कुमकुम भेंडी म्हणले जाते. ही भेंडी अतिशय पौष्टिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये जास्त उगवली जाणारी ही भेंडी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू शकते. कृषी वैज्ञानिकांनुसार ‘कुमकुम भिंडी’ मध्ये 94 टक्के पॉलीअनसेचुरेटेड फॅट्स असतात. जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलला कमी करतात. या भेंडीमध्ये 66 टक्के सोडियम असते. तसेच यामध्ये असणारे 5 टक्के प्रोटीन हे शरीरातील मेटाबॉलिव सिस्टिमला चांगले ठेवते. हिरव्या भेंडी प्रमाणेच तुम्ही या लाला भेंडीची देखील भाजी करू शकता.
हापूरमधील अनवरपूर येथील उमेश सैनी आणि रामपुरबेह येथील मुरली या दोघांनीही 'कुमकुम भेंडी' ची लागवड त्यांच्या शेतामध्ये केली आहे. सैनी यांनी सांगितले की, 'गावातील प्रत्येकजण आता या हंगामात कुमकुम भेंडी लागवडीबाबत विचार करत आहे.' आचार्य नरेंद्र देव आणि अयोध्याचे कुलपती बिजेंद्र सिंह यांच्यानुसार या लाल भेंडीमध्ये एंथोसायनिन आणि फेनोलिक्स असते. यामुळे शरीरातील पोषण मूल्ये वाढतात. या भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन बी कॉम्प्लेक्स देखील आहे.
Katrina Kaif : कतरिनासारखी पर्फेक्ट फिगर हवीये? जाणून घ्या तिचा खास डाएट प्लॅन
फेब्रुवारी ते एप्रिलचा दुसरा आठवडा हा काळ कुमकुम भेंडीच्या पेरणीसाठी योग्य आहे. बाजारात हिरव्या भेंडीची किंमत 12 ते 15 रुपये किलोपर्यंत आहे. तर या लाल भेंडीचा म्हणजेच ‘कुमकुम भेंडी’ची किंमत 45 ते 80 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे या भेंडीमुळे शेतकऱ्यांचे चांगले उत्पन्न होऊ शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Jaggery Tea Benefits | जाणून घ्या गुळाचा चहा पिण्याचे फायदे आणि अतिसेवनामुळं होणारे तोटे
- Weight Loss | वजन वाढलंय? उपाय शोधताय?, 'हा' सोपा उपाय ट्राय करा
- Weight Loss: आता शरीराचं वाढलेलं वजन कमी करणार 'जपानी वॉटर थेरपी'
Yoga Benefits And Belly Fat : झटपट वजन कमी करणारी 3 योगासनं; स्लीम अन् ट्रीम होण्यासाठी करतील मदत