Weight Loss: आता शरीराचं वाढलेलं वजन कमी करणार 'जपानी वॉटर थेरपी'
अनेकांना आपल्या वाढलेल्या वजनाची चिंता असते. हे वजन कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. जपानी वॉटर थेरपीच्या (Japanese water therapy) माध्यमातून अतिरिक्त वजन कमी केलं जाऊ शकतं असा अभ्यास सांगतोय.
Weight Loss: पाणी हे जीवन आहे असं म्हटलं जातंय. पाण्याविना कोणताही सजीव जगू शकणार नाही. पाणी आपल्या शरीरातील संतुलन कायम ठेवतं आणि विषाणूजन्य पदार्थ शरीराबाहेर फेकतं. शरीरातल्या मेटाबोलिजमसाठी पाण्याची मदत होते हे अनेक अभ्यासात दिसून आलंय. आता या पाण्याचा आणखी एक उपयुक्त वापर समोर येतोय. तो म्हणजे आपल्या शरीराचे अतिरिक्त वजन पाण्यामुळे कमी होऊ शकते. जपानमध्ये पाण्याच्या मदतीने शरीराचे वजन कमी केले जाते. याला जपानी वॉटर थेरपी म्हटलं जातं.
काय आहे जपानी वॉटर थेरपी पाण्याच्या वापराने आपल्या शरीराचे अतिरिक्त वजन कमी करता येतं असं अनेक अभ्यासातून स्पष्ट झालंय. रोज सकाळी उठल्यावर शक्य तितकं पाणी प्यावं असं जपानी वॉटर थेरपीमध्ये सांगितलं जातं. त्याचसोबत जेवणाचं एक वेळापत्रक पाळावं लागतं. त्यामध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये आणि दुपारच्या जेवणामध्ये मोठा गॅप असावा असं सांगितलं आहे.
कोरिओग्राफर गणेश आचार्यचं नवं रुप; घटवलं तब्बल 98 किलो वजन
पाण्यानं वजन घटू शकतं जेवणाच्या 30 मिनीटे आधी सुमारे अर्धा लिटर पाणी प्यावं असं या जपानी वॉटर थेरपीमध्ये सांगितलं आहे. हा नियम पाळणारे इतरांच्या तुलनेत 13 टक्के कमी जेवतात असं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. तसेच दुसऱ्या एका अहवालातून हे स्पष्ट झालंय की इतर ड्रिंक्सच्या तुलनेत पाण्याचे सेवन केल्यास कॅलरीचे इनटेक कमी होतं. त्यामुळे वजन नियंत्रित राहू शकते.
जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने कमी प्रमाणात जेवण जातं. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीचे सेवन केलं जात नाही. केवळ पाण्याचे नाही तर जेवणाचेही वेळापत्रक पाळल्यास आपले वजन कमी होऊ शकते. सकाळी उठल्यानंतर जवळपास 180 मिलीलिटर पाण्याचे सेवन करावे असे सांगितले जाते. त्यानंतर 45 मिनीटांनी नाश्ता करावा. जेवणाचा वेळही 15 मिनीटांचा असावा. त्यानंतर दिवसभर ज्या-ज्या वेळी तहान लागेल त्या त्या वेळी पाणी प्यायले पाहिजे.
दररोज खा 3 खजूर, जाणून घ्या याचे फायदे
ही वॉटर थेरपी जपानमध्ये खूप प्रसिद्धीस आली आहे. तसेच आता जगाच्या विविध भागातही याची लोकप्रियता वाढत असल्याचं दिसून येतंय. या बाबत संशोधकांनी समिश्र मते व्यक्त केली आहेत.
जपानी वॉटर थेरपीचा वापर करताना मात्र वैद्यकीय सल्ल्याने केलं तर ते चांगलं ठरेल. कारण गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात सोडिअमचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे मळमळणे, उलटी होणे असे त्रास होण्याची शक्यता आहे.