एक्स्प्लोर
लग्नाचे कपडे असे ठेवा जपून, अन् वापरा वर्षानुवर्ष!
मुंबई: लग्न म्हटलं की खरेदी ही आलीच. त्यातही कपड्यांची खरेदी तर जरा जास्तच. याच कपड्यांसाठी अनेकदा तासनतास आपण वाया घालवतो. फारच चोखंदळपणे आपण ते कपडे निवडतो. पण लग्न समारंभ आटोपताच या कपड्यांकडे आपण लक्षही देत नाही.
पण हेच कपडे जर आपल्याला वर्षानुवर्षे टिकवून ठेवायचे असल्यास यासाठी काही टिप्स देण्यात आल्या आहेत. लग्नानंतर तुमचे कपडे ड्राय क्लिनिंग करा. त्यानंतर ते मखमली कपड्यात ठेवा.
- लग्नातील कपडे अशा जागी ठेऊ नका जिथे वारंवार तापमानाचा परिणाम होतो.
- उजेडापासून कपड्यांचे संरक्षण करण्यासाठी मखमली कपड्यात बांधून ठेवा.
- कपडे कुठेही बाहेर ठेवण्याऐवजी ते हँगरला अटकवून कपाटात ठेवा.
- इतर कुठे हे कपडे वापरायचे असल्यास ते कपडे आधी ड्रायक्लिनिंग द्या.
- प्रवासादरम्यान हे कपडे एका बॅगमध्ये व्यवस्थित भरुन ठेवा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement