एक्स्प्लोर

Hiccups Reason: उचकी का लागते? खरंच पाणी प्यायल्यावर उचकी जाते की हा फक्त एक भ्रम? पाहा...

Hiccups Fact: शरीराच्या सर्वात खालच्या भागातून, म्हणजेच डायाफ्रामपासून उचकीची सुरुवात होते. उचकी का येते आणि पाणी प्यायल्यावर खरंच उचकी जाते का, ते जाणून घेऊया.

Hiccups Reason And Remedie: काही लोक म्हणतात की, उचकी लागते म्हणजे कोणीतरी तुमची आठवण काढतं. मात्र, या सर्व बोलण्याच्या गोष्टी आहेत, पण या सर्व गोष्टींवर विज्ञानाचा विश्वास नाही. अनेक वेळा वारंवार उचकी येण्यामुळे लोक त्रस्त होतात, अशा परिस्थितीत उचकी थांबवण्यासाठी त्यांना पाणी पिण्यास सांगितलं जातं. ही उचकी का येते? आणि त्यावर पाणी पिण्याचा काय परिणाम होतो? हे जाणून घेऊया.

उचकी का लागते?

उचकीची प्रक्रिया शरीराच्या सर्वात खालच्या भागात असलेल्या डायाफ्रामपासून सुरू होते. सामान्यतः जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा डायाफ्राम खाली खेचला जातो आणि तुम्ही श्वास सोडता तेव्हा मूळ स्थितीत परत येतो. डायाफ्राम आकुंचन पावल्यामुळे फुफ्फुस वेगाने हवा आत खेचू लागतात, ज्यामुळे व्यक्तीला उचकी येते. उचकी येण्याचं आणखी एक कारण पोटाशीदे खील संबंधित आहे. जर तुम्ही जास्त अन्न खाल्लं तर पोट फुगतं आणि त्यानंतरही उचकी येते.

जर उचकी खूप दिवस येत असेल तर...?

सहसा उचकी थोड्या काळासाठी येते आणि नंतर स्वतःच बरी होते, परंतु काहीवेळा उचकी येणं बराच काळ चालू राहतं. जेव्हा डायाफ्रामशी संबंधित नसांना नुकसान पोहोचते तेव्हा असे होते. मज्जासंस्थेच्या विकारामुळे उचकी देखील बऱ्याच काळापर्यंत राहू शकते.

उचकी कशी थांबवावी?

उचकी थांबवण्यासाठी अनेक घरगुती उपाय सांगितले जातात, ज्यामध्ये थंड पाणी पिणं सर्वात सामान्य आहे. पण काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, थोडा वेळ श्वास रोखून ठेवल्याने देखील आराम मिळतो आणि उचकी थांबते. कागदी पिशवीत श्वास घेतल्यानेही उचकी येणं थांबतं. वास्तविक, या दोन्ही पद्धतींमध्ये फुफ्फुसात फक्त कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो, ज्यामुळे डायाफ्रामला आराम मिळतो.

पाणी प्यायल्यामुळे खरंच उचकी थांबते का?

तज्ज्ञांच्या मते, उचकी हे एक प्रकारचे अनैच्छिक आकुंचन आहे, जे घरगुती उपचारांनी बरे होऊ शकते. पाणी पिणे हा फक्त एक उपाय आहे जो उचकी टाळण्यास मदत करू शकतो. उचकी थांबवण्यासाठी थंड पाणी प्यावं. थंड पाणी विविध कारणांमुळे होत असलेली डायाफ्रामची जळजळ टाळण्यास मदत करते, ज्यामुळे उचकी येते. त्यामुळे, थंड पाण्यामुळे उचकी थांबण्यास मदत होते, असे म्हणता येईल. परंतु हे 100% उचकी थांबवेलच असे नाही.

हेही वाचा:

Dog Facts: पाळीव कुत्रे नेहमी मालकाच्या मागे का लागतात? यामागे फक्त प्रेम हेच कारण नाही; पाहा...

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

No Sugar Challenge : 1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
Health: प्रोटीन सोप्या भाषेत! दैनंदिन आहारात प्रोटीनचा समावेश करण्यापूर्वी 'या' 6 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या...
प्रोटीन सोप्या भाषेत! दैनंदिन आहारात प्रोटीनचा समावेश करण्यापूर्वी 'या' 6 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या...
Health Tips : मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी अॅप्सचा वापर करताय? अॅप्सवर सर्वस्वी अवलंबून राहण्यामुळे वाढू शकते चिंता 
मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी अॅप्सचा वापर करताय? अॅप्सवर सर्वस्वी अवलंबून राहण्यामुळे वाढू शकते चिंता 
Health: कॅन्सर झाला म्हणजे करिअर संपले का? नव्याने करिअरची सुरुवात कशी कराल? डॉक्टर सांगतात...
कॅन्सर झाला म्हणजे करिअर संपले का? नव्याने करिअरची सुरुवात कशी कराल? डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
No Sugar Challenge : 1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
Laxman Hake : सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
Sonal Dinusha: पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
Supriya Sule: ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
Embed widget