Dog Facts: पाळीव कुत्रे नेहमी मालकाच्या मागे का लागतात? यामागे फक्त प्रेम हेच कारण नाही; पाहा...
Dog Facts: कधीकधी कुत्रे तुमच्या पाठीपाठी फिरतात, कारण कधीकधी त्यांना भूक लागली असते किंवा त्यांना तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यावं असं वाटत असतं.
Dog Facts: जर तुम्ही श्वानप्रेमी असाल किंवा तुम्ही कुत्रा पाळला असेल, तर तुम्हाला हे माहित असेल की हा एक असा प्राणी आहे जो त्याच्या माणसांवर खूप प्रेम करतो आणि नेहमी त्यांच्याशी निष्ठावान राहतो. घरात पाळलेली कुत्रे हे बरेच वेळा त्याच्या मालकाच्या मागे-मागे चालताना दिसतात. कधी कधी तुम्हाला कुत्र्यांच्या या कृती गोंडस वाटतात, तर कधी ते सतत पाहून तुम्ही त्रस्त होत असाल. पण कुत्रे असं का करतात हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? चला तर मग पाहूया की कुत्रे नेमकं असं का करतात.
कुत्रे मागे-मागे का फिरतात?
या विषयावर वेगवेगळ्या तज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. काही तज्ञांचं मत असं आहे की, कुत्रे हे आजच नाही तर शतकानुशतकं मानवासोबत राहत आली आहेत, परंतु हा असा प्राणी आहे ज्याला कळपात राहायला आवडतं, म्हणून जेव्हा कुत्रा एकटा असतो तेव्हा तो त्याच्या मालकाच्या जवळ जातो किंवा मागे-मागे फिरतो. बऱ्याचदा कुत्रे मालकाला आणि त्याच्या कुटुंबाला आपले कुटुंब समजू लागतात आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा तो कुटुंबातील कोणताही सदस्य किंवा त्याचा मालक कुठेतरी जाताना पाहतो तेव्हा तो त्यांच्या मागे जातो.
प्रेम असणं हे देखील आहे एक कारण
मेंटल फ्लॉसवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अमेरिकन केनेल क्लबच्या सदस्या डॉ. रॅचेल बराक सांगतात की, जेव्हा तुम्ही 6 महिन्यांच्या पिल्लाला तुमच्या घरी आणून ठेवता तेव्हा ते तुम्हाला त्याची आई समजतं. अशा परिस्थितीत तो आपल्या आईशी जसा वागतो तसाच तुमच्याशी वागतो. मोठे कुत्रेसुद्धा कधी कधी माणसांना खूप जवळचे समजतात, कारण ते असे प्राणी आहेत की ज्यांच्याकडून त्यांना प्रेम मिळतं तिथे ते त्यांचे बनतात.
भूक लागणं आणि अटेंशन मिळणं हे देखील कारण
काही तज्ञ म्हणतात की, कधीकधी कुत्रे तुमचा पाठलाग करतात कारण त्यांना भूक लागली आहे किंवा त्यांना तुमचे लक्ष (Attention) हवे आहे. तुम्ही पाहिलं असेल की, ज्यांना तुम्ही रोज बिस्किटं खाऊ घालता ते रस्त्यावरचे कुत्रेही तुम्हाला पाहताच तुमच्या मागे लागतात. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, त्यांनी तुम्हाला पाहिलं आहे आणि आता ते तुमच्याकडून बिस्किटांची अपेक्षा करत आहेत.
हेही वाचा: