Side Effects Of Coffee: सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिताय? होऊ शकतात या गंभीर समस्या
Side Effects Of Coffee: सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.
Side Effects Of Coffee: अनेकांना सकाळी उठल्यानंतर लगेच कॉफी (Morning Coffee Side Effects) प्यायची सवय असते. काही लोकांना दिवसातून तीन-चार कप कॉफी प्यायची सवय असते. कॉफी (Side Effects Of Coffee) प्यायल्यानं झोप जाते, असे अनेकांचे मत आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीनं होते. जर तुम्हाला रोज सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी कॉफी प्यायची सवय असेल तर तुम्हाला काही गंभीर समस्यांचा सामना करावा लागेल. सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.
Side Effects Of Coffee on weight amd Hormonal Disbalance : सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यानं या समस्यांचा करावा लागेल सामना
सकाळी रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन करू नये. विशेषतः महिलांनी रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळावे. कारण सकाळी रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्याने शरीरातील कोर्टिसोल हार्मोन (स्ट्रेस हार्मोन) ची पातळी वाढते, ज्यामुळे ओव्हुलेशन, वजन आणि हार्मोन्सवर वाईट परिणाम होतो (weight and Hormonal Effects). शरीरात स्ट्रेस हार्मोन्सची पातळी सकाळी जास्त आणि संध्याकाळी कमी असते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही सकाळी सर्वात आधी कॅफिनचे सेवन करता तेव्हा कोर्टिसोलची पातळी कमी होते. कोर्टिसोल हार्मोन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
सकाळी (Morning Tea or Coffee Side Effects) उठल्यानंतर तुम्ही आधी 2 ते 3 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्यानंतर तुम्ही कॉफी किंवा चहा काहीही पिऊ शकता. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही पाण्याऐवजी लिंबाचा रस (Morning lemon water & Honey) आणि मध (Morning lemon water & Honey) मिसळून ते पिऊ शकता.
Morning Coffee Side Effects : सकाळी वर्क-आऊटच्या आधी कॉफी प्या
कॉफीमध्ये (Coffee)उष्णतेचे प्रमाण जास्त असते. वर्क आऊट करताना जर तुम्हाला कॅलोरी बर्न करायचे असतील, तर तुम्हाला कॉफी प्ययल्याने ऊर्जा मिळेल. त्यामुळे वर्क आऊट करताना किंवा वर्क आऊटच्या नंतर तुम्ही कॉफी पिऊ शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Weight Loss Tips : ब्लॅक कॉफीमध्ये 'हे' पदार्थ मिसळा आणि वजन कमी करा; जाणून घ्या सोपी रेसिपी
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )