Health News : साध्या पाण्याऐवजी करा मिठाच्या पाण्याचं सेवन, आरोग्यासाठी लाभदायक
Salt Water Benefits : मिठाचं पाणी शरीरासाठी अतिशय लाभदायक आहे. यामुळे शरीराला आवश्यक पोषकतत्वं मिळतात.
Salt Water : शरीरासाठी पाणी (Water) अतिशय आवश्यक आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. आपल्या शरीरात 60 ते 70 टक्के पाणी असतं. मुबलक प्रमाणात पाण्याचं सेवन केल्यास अनेक रोगांपासूनही सुटका होते. त्यामुळे पाण्याचं महत्त्व प्रत्येकाला ठाऊक आहे. पण मिठाच्या पाण्याचं (Salt Water) सेवन केल्यास पाण्याची चव वाढते आणि हे आरोग्यासाठीही अतिशय लाभदायक ठरते, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर ही बातमी नक्की वाचा. पाण्यामध्ये मीठ मिसळून प्यायल्यास घशातील खवखव, पचनासंबंधित समस्या याशिवाय शरीरातील सूज अशा अनेक समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते.
मीठयुक्त पाण्याचे शरीरासाठी फायदे जाणून घ्या सविस्तर...
शरीर हायड्रेटेड ठेवा
तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मीठयुक्त पाणी फायदेशीप आहे. मिठाच्या पाण्याच्या मदतीने तुम्ही डिहायड्रेशनच्या समस्येवर मात करू शकता. मीठामध्ये असलेले सोडियम आणि मॅग्नेशियम तुमच्या शरीरातील द्रवपदार्थ संतुलित करतात, ज्यामुळे शरीराला हायड्रेट राहण्यास मदत होते.
घशातील खवखव दूर होईल
मीठयुक्त पाणी प्यायल्याने घशातील खवखब दूर होण्यास मदत होते. मिठाच्या पाण्याचं सेवन केल्याने घशातील सूज कमी होऊन आराम मिळतो. याशिवाय घशातील खवखव आणि घसा दुखण्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
पचनासंबंधित समस्यांपासून सुटका
पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी आणि पचनासंबंधित समस्या दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्याचं सेवन करा. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या दूर होण्यासाठी मदत होईल. यासाठी एक ग्लास पाणी घ्या. त्यात थोडे काळे मीठ (Black Salt) किंवा सैंधव मीठ (Rock Salt) घाला. त्यानंतर हे पाणी प्यावे. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारू शकते.
मेंदू निरोगी ठेवण्यास मदत
मिठाचं पाणी प्यायल्याने तुमच्या मेंदूलाही खूप फायदा होतो. यामुळे मेंदूचा विकास होण्यास मदत होते. यासोबतच तणाव आणि नैराश्यही कमी होण्यासाठी हे फायदेशीर आहे.
सूज कमी करण्यासाठी गुणकारी
मिठाचे पाणी प्यायल्याने शरीराची सूज कमी होते. मिठामध्ये असलेले मॅग्नेशियम शरीरातील सूज आणि जळजण कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. विनाकारण शरीरात सूज येत असेल तर मिठाच्या पाण्याचे सेवन करा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
-
Headache : डोकेदुखीवर आयुर्वेदिक उपचार, 'या' टिप्स नक्की वापरा
- Weight Loss : रात्रीच्या जेवणात 'या' पदार्थांचं करा सेवन, पोट भरेल आणि वजनही कमी होईल
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )