Sinus आणि Covid Infection दोघांची लक्षणं सारखीच, पण कसा ओळखाल फरक?
Sinus and Covid Infection : बऱ्याचदा साधा खोकला किंवा सर्दी झाली, तरी आधी कोरोनाचा विचार मनात येतो अन् धडकी भरते. पण सर्दी, खोकला होण्यामागील कारण दरवेळी कोरोनाच नाहीतर, सायनस इन्फेक्शनही असू शकतं.
How to Differentiate Between Sinus and Covid Infection : पावसाळा म्हणजे, खिडकीबाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या धारा, हातात वाफळत्या चहाचा कप आणि गरमागरम भजी. पण याव्यतिरिक्त विचार करायचा झाल्यास, पावसाळा म्हणजे सर्दी, पडसं, ताप, खोकला आणि बरंच काही... पावसाळ्यात अनेक आजारही डोकं वर काढतात. काही काळापूर्वी पावसाळ्यातील आजारांकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नव्हतं. ऋतू बदलानुसार शरीराच्या समस्या उद्भवतात, तशाच पावसाळ्यातल्या या समस्या म्हणूनच सगळे घरच्या घरीच यावर उपाय करायचे. पण कोरोनानं (Coronavirus) आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं आहे. अशातच आता जरासा खोकला किंवा सर्दी झाली तरी सर्वात आधी विचार कोरोनाचा येतो.
बऱ्याचदा कोरोनाची लक्षणं नसतात, पण तरी कोरोनाच्या विचारानं अगदी घाबरुन जायला होतं. असचं काहीसं सायनस इन्फेक्शनबाबतही होतं. यामध्ये आणि कोरोनाच्या इन्फेक्शनची अनेक लक्षणं मिळती-जुळती आहेत. दोघांच्या लक्षणांमध्ये फारसा बदल नाही. पण तुम्ही काही गोष्टी लक्षात घेऊन यामधील फरक ओळखू शकता.
का असतात सारखी लक्षणं?
नाकाच्या आतमध्ये असलेल्या एअर फिल्ड पॉकेट्स ज्यांना सायनस डक्ट म्हणतात, त्याला सूज येते, त्यावेळी सायनस इन्फेक्शन होतं. या ब्लाकेजमुळे म्यूकस नाकाबाहेर पडू शकत नाही. त्यामुळे यात असलेले बॅक्टेरिया इंफेक्शन पसरवतात.
कोरोना व्हायरसमध्येही कंजेशन आणि डोकेदुखी ही सायनस डक्टमध्ये सूज येण्याची मुख्य कारणं आहेत. दोघांमधील सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे, सायनस इंन्फेक्शनची लक्षणं समोर येण्यास बराच अवधी लागतो. तर कोरोनाची लक्षणं लगेच समोर येतात.
दोघांमधील साम्य काय?
दोन्ही समस्यांमध्ये एकसारखीच लक्षणं दिसून येतात. वाहणारं नाक, डोकेदुखी, घशात खवखव, खोकला, ताप आणि थकवा. याव्यतिरिक्त काही लक्षणं सायनस इन्फेक्शनमध्ये दिसून येतात. पण ही लक्षणं कोविडमध्ये दिसत नाहीत. ती लक्षणं म्हणजे; घशात, कपाळावर किंवा डोळ्यांवर ताण जाणवणं, पोस्ट नेजल ड्रीप, दात दुखणं, श्वासात दुर्गंधी जाणवणं आणि नाकातून वेगवेगळ्या रंगांचं द्रव्याचा स्त्राव होणं.
काही लक्षणं, जी कोरोनामध्ये आहे, पण सायनस इन्फेक्शनमध्ये जाणवत नाहीत
आता जाणून घेऊया अशी काही लक्षणं जी कोरोनामध्ये दिसून येतात, पण सायनस इन्फेक्शनमध्ये दिसत नाहीत. श्वास घेण्यास त्रास होणं, अंगदुखी किंवा सांधेदुखी जाणवणं, पोटाच्या समस्या उद्भवणं, चव आणि गंध न येणं. दरम्यान, वरीलपैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष न करा त्वरित डॉक्टरांकडे जावं.
(टीप : वरील वृत्त वाचकांपर्यंत केवळ माहिती म्हणून पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )