जगातला सर्वात महाग 'गोडवा'.. एक वाटी मधाच्या किंमतीत घेऊ शकता नवीकोरी गाडी...
Costly honey: जगातल्या सर्वात महाग मध बनवण्याची प्रक्रिया जरा खास आहे. या मधाला दर्जेदार गुणवत्ता देण्यासाठी कंपनी या मधाला दूर जंगलात जाऊन बनवते.
Costly Honey: मध ही एक अशी गोष्ट आहे जी अनेक वर्षांपासून वापरली जात आहे. मधाला अतिशय पवित्र मानले जाते. पूजा, होमहवन यामध्येसुद्धा मधाचा वापर केला जातो. तसं बघायला गेलं तर मध कोणत्याही दुकानात सहज उपलब्ध होते आणि त्याची किंमतसुद्धा अगदी माफक असते. ती किंमत अगदी आपल्या खिशाला परवडणारी असते. पण आज आपण अशा मधाविषयी जाणून घेणार आहोत जे जगातलं सर्वात महाग मध आहे. या मधाच्या किंमतीत तुम्ही नवी कोरी गाडी खरेदी करू शकता.
कोणतं आहे हे मध?
हे मध सेंटौरी तुर्की या कंपनीचे आहे. ही कंपनी जगातलं सर्वात महाग मध बनवते आणि गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डसुद्धा हेच सांगते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या वृत्तानुसार, या कंपनीचे मध जगात सर्वाधिक किंमतीने विकले जाते. एक किलो मधाची किंमत जवळपास 10 हजार युरो इतकी आहे. जर भारतीय रुपयात बघायला गेले तर ही किंमत 9 लाखांपेक्षा जास्त आहे. या किमतीत तुम्ही नवीकोरी गाडी सहज विकत घेऊ शकता.
या मधात काय आहे विशेष..
नक्की असं काय विशेष आहे या मधात असा प्रश्न आता नक्कीच पडला असेल. मध म्हटलं की पटकन गोडवा निर्माण करणारा पदार्थ. पण या मधामुळे तसा फारसा गोडवा निर्माण होत नाही आणि हीच या मधाची विशेष गोष्ट हीच आहे. हे मध पूर्णपणे गोड नसते, त्यात थोडा कडवटपणा असतो. हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. यात मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे महत्त्वाचे गुणधर्म असतात. साधारणपणे नैसर्गित मध वर्षांतून दोन - तीन वेळा बनवले जाते, परंतु हे मध वर्षातून एकदाच बनवले जाते. म्हणून हे जास्त महाग आहे.
मध बनवण्याची विशेष पद्धत...
हे मध इतकं का महाग आहे याचा अंदाज बनवण्याच्या प्रक्रियेवरूनच येतो. हे मध साध्या कारखान्यात किंवा मधाच्या एखाद्या पोळ्यापासून नाही तयार होत. तर या मधाला बनवण्याची प्रक्रिया खूपच विशेष आहे. या मधाला उत्तम दर्जाचे बनवण्यासाठी कंपनी मानवी वस्तीपासून दूर असलेल्या जंगलातील गुहेत बनवतात. या गुहेच्या चारी बाजूंनी औषधी वनस्पती लावल्या जातात. त्यामुळे मधमाश्या या वनस्पतीतील फुलांच्या रसापासून औषधी मध तयार करु शकतात. या मधाला बाजारात विकण्यापूर्वी तुर्की फूड इंस्टीट्युटमध्ये त्याची गुणवत्ता तपासली जाते, मग हे मध बाजारात विकले जाते.
संबंधित बातमी
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )