एक्स्प्लोर

Buldhana Ghatmandni : बुलढाण्यातील भेंडवळची घटमांडणी परंपरा नेमकी काय? वर्षभराचे अंदाज नेमके कसे व्यक्त केले जातात?

Buldhana: भेंडवळमध्ये घटमांडणीची अनोखी परंपरा चालत आली आहे, त्यातून वर्षभरातील हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, राजकीय घडामोडींचा अंदाज घेतला जातो. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ही परंपरा जोपासली जाते.

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी भेंडवळ गाव वसले आहे. या गावात प्राचीन घटमांडणी परंपरा जोपासली जाते. ज्यानुसार विविध अंदाज वर्तवले जातात. गेल्या 370 वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ही परंपरा जोपासली जाते, ज्यानुसार दुसऱ्या दिवशीचे हवामान, किती पाऊस पडणार? याचा अंदाज वर्तवला जातो. घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजांवरून राज्यभरातील शेतकरी आपल्या वर्षभराच्या पीक-पाण्याचे नियोजन करतात, त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असते. पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा वेध घेणारी भेंडवळची घटमांडणी दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाते.

घटमांडणी नेमकी कशी करतात?

भेंडवळच्या घटमांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे. शेतात मध्यभागी खोल खड्डा करुन त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो. घटात चार मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोई, कुरडई ठेऊन घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध 18 प्रकारची धान्ये मांडली जातात. घटाच्या वर्तुळाकार अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा ही धान्ये मांडली जातात.

अंदाज आणि भाकिते  कशावरून व्यक्त केली जातात?

घटामध्ये रात्रभर होणाऱ्या नैसर्गिक बदलाचे पहाटे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पाऊस, हवामान, पीक, अर्थव्यवस्था तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटाबाबत चाहूल देणारे भाकीत वर्तवण्यात येते. या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा अतुट विश्वास आहे. या भाकिताचा आधार घेऊन ते आपल्या पिकपाण्याचे नियोजन करत असतात. मातीच्या ढेकळावरून चार महिन्यांच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. विविध धान्यांवरून आगामी हंगामातील पिके कसे राहतील, हे सांगण्यात येते. चारा-पाणीसाठी सांडाई, कुरडई, तर पुरी निसर्गाशी संबंधित राहते. करंजीवरून देशाची आर्थिक परिस्थिती सांगण्यात येते. भादली हे रोगराईचे, तर पान-विडा राजाच्या गादीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. राजा म्हणजे पंतप्रधान. पान, विड्यात होणाऱ्या बदलावरून भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले जाते. मसूर हे पीक परकीय घुसखोरीचे द्योतक आहे.

शेतकरी यावर विश्वास का ठेवतात आणि शेतकऱ्यांसाठी भाकीत महत्त्वाचे का?

घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी विदर्भ, खानदेश, मराठवाड्यासह अनेक भागातून शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामाला येतात, या परिसरात हजारोंच्या संख्येने शेतकरी एकत्रित जमतात. शेतकरीच नव्हे तर बी-बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधीही शेतकऱ्यांचा आगामी काळातील कल लक्षात घेण्यासाठी येथे गर्दी करतात. शेतकरी वर्ग घटमांडणीचे भाकीत घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची, हे ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तवण्यात येत असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आशेचा किरण बनली आहे.

सुमारे 370 वर्षांपासून जोपासली जात आहे परंपरा!

भेंडवळ घटमांडणीची परंपरा सुमारे 370 वर्षांपासून दरवर्षी विश्वासाने जपली जात आहे. त्याकाळचे महान तपस्वी चंद्रभान महाराजांचा वसा त्यांच्या वंशजांनी आजही टिकवून ठेवला. आता त्यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ व सारंगधर महाराज हे घटाची पाहणी करून वर्षभराचे अंदाज व्यक्त करतात. चंद्रभान महाराज वाघ यांनी सुमारे 1650 साली वातावरणातील बदलावरून नक्षत्रांचा अभ्यास केला. त्यांनी पुढे पाऊस, पिकांची भविष्यवाणी करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ही घटमांडणी सुरू केली, असे या ठिकाणी सांगण्यात येते. घटमांडणी अक्षय्य तृतीयेला होते, त्यातील बदलावरून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वीचा अंदाज सांगण्यात येतो.

घटमांडणीला शास्त्रीय आधार आहे का?

घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही या परंपरेचे बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेले नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून, याच्या भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकिते बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला निव्वळ ठोकताळे म्हणत असले तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन काय आहे?

भेंडवळची घटमांडणी म्हणजे निव्वळ ठोकताळे असून यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन अंनिसतर्फे करण्यात आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलाकर यांनी हे आवाहन केले आहे. 

(टीप : 'भेंडवळची घट मांडणी' ही बुलढाण्यातील भेंडवळ गावातील स्थानिक परंपरा आहे. त्यातून ते पावसाचा अंदाज वर्तवतात असा त्यांचा दावा आहे. स्थानिकांचा त्यावर विश्वास आहे. एबीपी माझा केवळ या घटनेचं वार्तांकन करतंय. घटमांडणीच्या परंपरेचं समर्थन करत नाही.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget