Corona Treatment : कोरोना व्हायरसच्या आजारात कोणती औषधं घ्यावीत आणि कोणती घेऊ नयेत ? WHO ने जाहीर केल्या गाईडलाईन्स
Covid-19 : जागतिक आरोग्य संघटनेने मागच्या आठवड्यात कोरोना संबंधित नवीन गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये 2 नवीन औषधांचा समावेश केला आहे. तसेच आजारात कोणत्या औषधांचा वापर करावा हेही सांगितले आहे.
![Corona Treatment : कोरोना व्हायरसच्या आजारात कोणती औषधं घ्यावीत आणि कोणती घेऊ नयेत ? WHO ने जाहीर केल्या गाईडलाईन्स Coronavirus treatment which medicine and drugs to use and what is reject who new covid-19 guidelines Corona Treatment : कोरोना व्हायरसच्या आजारात कोणती औषधं घ्यावीत आणि कोणती घेऊ नयेत ? WHO ने जाहीर केल्या गाईडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/722bc6f9936083f895673f0c799ad3e2_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Omicron Medicine : कोरोनाचा तिसरा व्हेरियंट ओमायक्रॉनसह संपूर्ण देशात तिसरी लाट वेगाने पसरली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाकडून नियमांचे पालन करण्यास सांगितले जाते. कोरोना लसीकरणाचा बूस्टर डोसदेखील आला आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होते. भारतासह संपूर्ण जगात कोरोना रूग्णांची संख्या वाढतेय. अशातच तुम्हाला योग्य उपचार आणि औषधांविषयी माहिती असणे गरजेचे आहे. World Health Organization (WHO) ने नुकतीच उपचारासंबंधित औषधांची गाईडलाईन जारी केल्या आहेत. यामध्ये 2 नवीन औषधांचा उल्लेख केला आहे. याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या.
या औषधांचा वापर करा
WHO च्या नवीन गाईडलाईन्सनुसार, कोरोनाच्या उपचारा दरम्यान, बारिसिटीनिब, कॅसिरिविमॅब-इमदेविमॅब, टोसीलिजुमॅब किंवा सरीलूमॅब, रूक्सोलिटीनिब यांसारख्या ड्रग्सशी संसर्गित लोकांना देऊ शकतात. यामध्येसुद्धा तज्ज्ञांनी खासकरून बारिसिटीनिब, टोसीलिजुमॅब, सरीलूमॅब यांसारख्या औषधांना प्राधान्य दिले आहे.
या औषधांचा वापर करू नका
WHO ने ज्या औषधांचा वापर करण्यास विरोध केला आहे अशा औषधांत हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, आयवरमेक्टिन, लोपिनाविर आणि रेमेडिसिविर यांसारख्या औषधांचा समावेश आहे. ही औषधं शरीरावर गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी उपयोगी नाहीत. यामधल्या काही औषधांना क्लिनील ट्रायलसाठीसुद्धा पाठविण्यात आले आहे.
लहान मुलांना कोणती औषधं द्यावीत ?
WHO नुसार, कोरोना झालेल्या मुलांना कॅसिरिविमॅब-इमदेविमॅब यांसारखी औषधं देऊ शकतात. चांगली गोष्ट अशी की लहान मुलांत कोरोनाचा गंभीर परिणाम फार कमी दिसून आले आहेत.
लसीकरण सर्वात प्रभावी :
WHO ने गाईडलाईन्समध्ये स्पष्ट केले आहे की कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लसीकरण हा मुख्य पर्याय आहे. ज्यांनी लसीकरण प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण फारच कमी आढळून आले आहे. तर बूस्टर डोससुद्धा कोरोनापासून वाचण्यासाठी फायदेशीर ठरतो आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- आधी कोरोना.. मग डेल्टा, आता ओमायक्रॉन; आणखी गंभीर रुपं घेणार कोरोना, तज्ज्ञांचा दावा
- Coronavirus : चहा ऐवजी 'या' तीन काढ्यांचे करा सेवन, संसर्गापासून होईल संरक्षण, चवही राहील कायम
- Immunity Booster : हिवाळ्यात अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती, 'या' फळांमधून शरीराला मिळतील सर्व आवश्यक व्हिटामिन्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)