ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 07 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 07 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता, ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, एबीपी माझाकडे विश्वसनीय सूत्रांची माहिती
करुणा मुंडेंच्या मुलाकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, आईनेच वडिलांचा छळ केल्याचा दावा, तर धनंजय मुंडेंच्या दबावाखाली मुलाने पोस्ट केल्याचा करुणा मुंडेंचा आरोप
कृषी साहित्य स्वस्तात खरेदी केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा फोल, बाजारभावापेक्षा जास्त किंमत मोजल्याचं एबीपी माझाच्या रियालिटी चेकमध्ये उघड
अखेर नाराज भुजबळांना अजित पवारांचा फोन, चार दिवसांपूर्वी झालेल्या संभाषणाची भुजबळांनीच दिली माहिती, अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केल्याचा दावा
मुंबई महापालिकेतली देणी पुढची २३ वर्षे चुकवावी लागणार, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका, ९२ हजारांच्या मुदत ठेवी ८० हजार कोटींवर गेल्याचाही आरोप
नव्या आयकर विधेयकाला आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता, पुढील आठवड्यात संसदेत सादर होणार विधेयक
आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस, २५ बेसिस पाॅईंट्सनं रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता, तर एटीएम ट्रान्झॅक्शन फीमध्ये वाढ होण्याची शक्यता




















