Cholesterol Causes : आईस्क्रिम खाल्ल्यानेही वाढतो कॉलेस्ट्रॉल; वेळीच सावध व्हा; 'या' गोष्टींची काळजी घ्या
Cholesterol Causes : जर तुम्हाला आईस्क्रीम खाण्याची आवड असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
Cholesterol Causes : थंडगार आईस्क्रिम (Ice Cream) खाणं कोणाला आवडत नाही. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येकाला आईस्क्रिम खायला आवडते. आइस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर्स प्रत्येकालाच आकर्षित करतात. बहुतेक लोक थंड होण्यासाठी आईस्क्रीमचे सेवन करतात. तर, काही लोकांना आईस्क्रिम मिठाईमध्ये खायला आवडते. मात्र, एक वाटी आईस्क्रिम तुमच्या शरीरात कॉलेस्ट्रॉलची (Cholesterol) पातळी मोठ्या प्रमाणात वाढवू शकते. आईस्क्रीममध्ये भरपूर चरबी असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. आईस्क्रिम खाल्ल्याने कोणकोणते नुकसान होते या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
आईस्क्रीम आणि कोलेस्ट्रॉल
हेल्थ लाइननुसार, जर एखादी व्यक्ती रात्री एक वाटी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर झोपली तर त्याच्या कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षणीयरित्या वाढू शकते. खरंतर, आईस्क्रीममध्ये अनेक चरबीयुक्त पदार्थ असतात जे तुमच्या शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात.
आईस्क्रीममुळे लठ्ठपणा वाढतो
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्ही आईस्क्रिमचे जास्त सेवन करू नये. कारण यामुळे तुमच्या शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी तर वाढतेच. पण, त्याचबरोबर रक्तातील साखरेची पातळी आणि लठ्ठपणाही लक्षणीयरित्या वाढतो.
सरबत प्यायल्यानेही नुकसान होते
जर तुम्ही आईस्क्रिमऐवजी दूध आणि साखरयुक्त पेयाचे सेवन केले तर त्यामुळेही तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरबतचे देखील कमी प्रमाणात सेवन करा.
'या' पदार्थांचे सेवन करा
जर तुम्हाला कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही एॅवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, नट्स आणि फॅटी फिश इत्यादी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करू शकता. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : तांदळाचे जसे फायदे तसे तोटेही; जाणून घ्या अति प्रमाणात भात खाण्याचे दुष्परिणाम
- Weight Loss : रात्रीच्या जेवणात 'या' पदार्थांचं करा सेवन, पोट भरेल आणि वजनही कमी होईल
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )