एक्स्प्लोर

Does Collagen Prevent Ageing Signs : तुमच्या त्वचेचं म्हातारपण रोखण्याचं काम खरंच 'कोलेजन' करतं? तज्ज्ञ सांगतात...

Benefits of Collagen for Skin: कोलेजन सप्लिमेंट्स आणि प्रोडक्ट विकणाऱ्या कंपन्या असा दावा करतात की, कोलेजन केवळ वयामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करत नाही तर वयोमानानुसार, येणाऱ्या बारीक रेषांना रोखतं आणि तुमची त्वचा तरुण दिसण्यास मदत करतं.

Does Collagen Really Prevent Ageing Signs : कोलेजन (Benefits of Collagen) हा शब्द आरोग्य (Health Care), जीवनशैली आणि निरोगीपणाच्या जगात गेल्या काही काळापासून खूप चर्चिला जात आहे. टीव्हीपासून सोशल मीडियापर्यंत (Social Media) आणि अगदी मार्केटमध्ये कोलेजनशी संबंधित उत्पादनांची भरभराट आहे. कोलेजन हे वाढत्या वयाची त्वचेवर दिसणारी लक्षणं (Skin Care Rutine) दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं. जर तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल आणि त्वचेची काळजी (Skin Care) किंवा मेकअपमध्ये इंटरेस्टेड असाल, तर तुमच्या सोशल मीडियावर तुम्हाला एक गोष्ट नेहमीच दिसेल, ती म्हणजे कोलेजनशी संबंधित माहिती. मग ते फूडबाबत असो वा सीरम (Sirum), फेस क्रीम (Face Cream), शीट मास्क (Sheet Mask) किंवा सप्लिमेंट्सद्वारे असो. कोलेजन आणि त्याचा वापर करून तयार केलेली उत्पादनं तुम्हाला तुमच्या त्वचेचं तारुण्य कायम ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

सोशल मीडिया आणि त्याची विक्री करणाऱ्या हजारो ब्रँड्सच्या मते, कोलेजन केवळ वृद्धत्वामुळे होणाऱ्या सुरकुत्यांशी लढत नाही, तर वयानुसार येणाऱ्या चेहऱ्यावरील बारीक सुरकुत्यांनाही प्रतिबंधित करते. यामुळे त्वचेचं तारुण्य टिकून राहण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, कोलेजन त्वचेच्या आरोग्यासोबतच तारुण्य टिकवण्यासही मदत करतं. एखाद्या जादूप्रमाणे कोलेजन त्वचेवर तेज आणतं. हे सर्व ठिक आहे, असं मानलं तरीदेखील नेमकं प्रत्यक्षात हे आहे तरी काय? जाणून घेऊयात सविस्तर... 

कोलेजन म्हणजे काय?

सोप्या शब्दांत कोलेजन हे त्वचेसाठी अत्यंत गुणकारी ठरतं. जे त्वचा लवचिक ठेवण्यास मदत करतं. कोलेजन हे एक प्रकारचा प्रोटीन आहे, जे तुमची त्वचा, हाडं, स्नायू आणि लिगामेंट्समध्ये आढळतं. ते तुमच्या त्वचेला ताकद आणि लवचिकता देतं. तुमची हाडं मजबूत राहण्यास मदत करतं आणि तुमच्या अवयव आणि स्नायूंच्या संरचनेला पाठींबा देतं. 

तुमच्या सौंदर्याच्या दृष्टीनं, तुमच्या चेहऱ्याच्या आरोग्यासाठी आणि प्रेझेंटेशनसाठी (तुम्ही कसे दिसता) कोलेजन महत्त्वाचं आहे. यामुळे तुमची त्वचा लवचिक आणि मुलायम राहण्यास मदत होते.

मुंबईस्थित त्वचारोगतज्ञ, कॉस्मोलॉजिस्ट डॉ. शुभांगिनी शर्मा यांनी इंडिया टुडेला सांगितलं की, जेव्हा आपण तरुण असतो, तेव्हा आपलं शरीर आपल्या चेहऱ्यासाठी चांगल्या प्रमाणात कोलेजन तयार करतं. ज्यामुळे आपला चेहरा तजेलदार होतो. कालांतराने आपल्या शरीरातील कोलेजन कमी होतं, परिणामी बारीक रेषा आणि सुरकुत्या यांसारखी वाढत्या वयाची लक्षणं त्वचेवर दिसू लागतात.

खरंच कोलेजन त्वचेसाठी जादुई ठरतं का?

आज प्रत्येकाच्याच तोंडी कोलेजनचं नाव आहे. याचं संपूर्ण श्रेय सोशल मीडियाला जातं. अनेक सेलिब्रिटी सर्रास कोलेजनबाबत बोलताना दिसतात. सेलिब्रिटी तजेलदार, चकाकदार त्वचेचं संपूर्ण श्रेय कोलेजनला देतात. 

Does Collagen Prevent Ageing Signs : तुमच्या त्वचेचं म्हातारपण रोखण्याचं काम खरंच 'कोलेजन' करतं? तज्ज्ञ सांगतात...

कोलेजनयुक्त प्रोडक्ट्स त्वचेवर लावल्यानं मदत मिळते? 

कोलेजन शब्द गुगलवर सर्च केला, तर हजारो प्रोडक्ट्स तुमच्या समोर येतात. हे सर्व प्रोडक्ट्स शरीरातील कोलेजनचं उत्पादन वाढवण्याचा दावा करतात. यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थकडून 2022 मधील संशोधनातून निष्पन्न झाल्यानुसार, अप्लाय करणारे (म्हणजे क्रीम आणि सीरम) आणि सेवन केलेली औषधं (म्हणजे कोलेजन सप्लिमेंट्स) दोन्ही त्वचेवरील एजिंग साईन्स कमी करण्यासाठी मदत करतात. 

Does Collagen Prevent Ageing Signs : तुमच्या त्वचेचं म्हातारपण रोखण्याचं काम खरंच 'कोलेजन' करतं? तज्ज्ञ सांगतात...

कोलेजन काम काय करतं? 

कोलेजन शरीरातील अनेक पेशींमधून स्त्रवतं, परंतु मुख्यतः कनेक्टिव टिश्यूच्या (Connective Tissue) पेशींमधून स्त्रवतं. त्वचेच्या आतील मिडल लेयरवर (ज्या डर्मिस म्हणतात) कोलेजनच्या तंतूंच्या मदतीनं पेशींच्या तंतूंची जाळी तयार होते, ज्याला 'फायब्रोब्लास्ट' (Fibroblast) नावानं ओळखलं जातं. हे त्वचेच्या मृत पेशी हटवण्यासोबतच नव्या पेशी तयार करण्याचंही काम करतात. याव्यतिरिक्त काही कोलेजन किडनी सारखे नाजूक अवयव जपण्यासाठी सरक्षा कवचाप्रमाणे काम करतं. 

वाढत्या वयानुसार शरीरात कोलेजनची कमतरता निर्माण होते, त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या सुरू होतात. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. विशेषतः स्त्रियांमध्ये, रजोनिवृत्तीनंतर कोलेजन झपाट्यानं कमी होतं. आणि वयाच्या साठीनंतर, कोलेजन उत्पादनात घट ही एक सामान्य गोष्ट आहे.

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

PCOS Belly: PCOS मुळे पोट वाढलंय? पोटाचा घेर कमी करण्यासाठी पाण्यात 'हे' 3 पदार्थ एकत्र करा अन् प्या!

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole Speech BKC: आमच्या हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो - नाना पटोलेUddhav Thackeray : मविआच्या मंचावर उद्धव ठाकरेंची एन्ट्री, नाना पटोलेंनी भाषण थांबवलं!Atal Setu Bridge Story : मुंबईकरांचं आयुष्य बदलणारा एक पूल! अटल सेतूच्या निर्मितीची संपूर्ण कहाणीUddhav Thackeray Speech : मुंब्रात शिवरायांचं मंदिर, भर सभेत उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
Embed widget