एक्स्प्लोर
Fruit Stickers Codes : फळांवरील छोट्या स्टिकर्समध्ये लपलंय मोठं गुपित! जाणून घ्या त्याचा अर्थ
Fruit Stickers Codes : फळांवरील स्टिकर्सवरील कोड फळ सेंद्रिय, रासायनिक की जनुक बदललेले आहे हे ओळखण्यासाठी वापरले जातात.
Fruit Stickers Codes
1/9

फळांवरचे स्टिकर्स म्हणजे काय असतात हे तुम्हाला माहीत आहे का? हे स्टिकर्स का लावले जातात आणि त्यांचा उपयोग काय असतो ते जाणून घेऊया.
2/9

त्यावर काही अंक किंवा बारकोड असतात. आपण ते काढून टाकतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का ते का लावलेले असतात? चला जाणून घेऊया त्यांचा अर्थ आणि उपयोग.
3/9

हे कोड फळ कसे उगवले गेले आहे ते सांगतात. त्यांना PLU कोड म्हणतात आणि ते फळे भाज्या ओळखण्यासाठी वापरले जातात.
4/9

हे कोड फक्त बिलिंगसाठी नसतात, तर ते फळ सेंद्रिय आहे की रासायनिक किंवा जनुकीय पद्धतीने तयार केले आहे हेही सांगतात.
5/9

या कोडमध्ये 4 किंवा 5 अंक असतात. पहिला अंक फळ कसे पिकवले गेले आहे हे सांगतो. हा कोड पाहून तुम्ही ओळखू शकता की फळ नैसर्गिक आहे की रासायनिक पद्धतीने उगवले आहे.
6/9

स्टिकरवर 9 ने सुरू होणारा 5 अंकी नंबर असेल तर फळ सेंद्रिय, 4 अंकी नंबर असेल तर ते सामान्य पद्धतीने पिकवलेले असते.
7/9

याचा अर्थ त्या फळांवर रासायनिक कीटकनाशके किंवा खते वापरली गेली आहेत. ही फळे स्वस्त असतात, पण सेंद्रिय फळांइतकी स्वच्छ किंवा पौष्टिक नसतात.
8/9

जर तुम्हाला 8 ने सुरू होणारा पाच अंकी कोड दिसला, तर ते फळ जनुक बदललेले (GMO) असते. आता तुम्हाला फळांच्या स्टिकर्सचं रहस्य कळलं पुढच्यावेळी फळ घेताना तो कोड नक्की पहा.
9/9

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 05 Nov 2025 04:31 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
रायगड


















