एक्स्प्लोर
Breakfast : सकाळचा नाश्ता खरंच इतका महत्त्वाचा आहे का? जाणून घ्या सत्य!
Breakfast : जर मोठ्यांनी नाश्ता नाही केला तरी काही फरक पडत नाही. पण मुलांसाठी नाश्ता करणे खूप आवश्यक आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार,
Breakfast
1/11

आपल्यापैकी अनेक जण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की, सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार असतो.
2/11

पण आता एका नवीन संशोधनात नाश्त्याबाबत समोर आला आहे की, संशोधनात आढळले की नाश्ता करणारे आणि न करणारे यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेत फारसा फरक नसतो.
3/11

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मेंदूला ऊर्जा ग्लुकोज आणि शरीरातील फॅटमधून मिळते.
4/11

जेव्हा आपण बराच वेळ काही खात नाही, तेव्हा शरीर केटोन्स नावाचे घटक तयार करतं.
5/11

हे घटक मेंदूला नीट कार्य करण्यासाठी ऊर्जा पुरवतात. काही तास उपवास केल्यानेही मेंदूच्या कार्यावर काही परिणाम होत नाही.
6/11

जर 8, 12 किंवा 16 तास उपवास केला तर मेंदूसाठी सुरक्षित मानलं जातं.
7/11

जर काही वेळासाठी अन्न नाही खाल्लं तर तुमच्या शरीर आणि मेंदूवर कोणताही वाईट परिणाम होऊ शकत नाही.
8/11

संशोधनात हेही सांगितले आहे की, मोठ्यांनी नाश्ता न केल्याने काही फरक पडत नाही. पण मुलांसाठी नाश्ता करणे खूप आवश्यक आहे.
9/11

मुलं वाढीच्या टप्प्यात असतात, त्यामुळे त्यांना पौष्टिक नाश्ता हवा असतो. यामुळे त्यांचे शरीर आणि मेंदू दोन्ही मजबूत राहतात.
10/11

प्रौढ व्यक्तींनी कधी कधी नाश्ता चुकवला तरी काळजीची गरज नाही. त्यांचे शरीर आणि मेंदू या बदलाशी सहज जुळवून घेतात.
11/11

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 05 Nov 2025 05:33 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















