एक्स्प्लोर

PCOS Belly: PCOS मुळे पोट वाढलंय? पोटाचा घेर कमी करण्यासाठी पाण्यात 'हे' 3 पदार्थ एकत्र करा अन् प्या!

PCOS Belly Fat : पीसीओएस (PCOS) म्हणजेच, पॉलीसिस्टिक ओव्हरी (Polycystic Ovary Syndrome) ही आजकाल महिलांमध्ये (Women's Issues) एक सामान्य समस्या आहे. पूर्वी ही समस्या 30-35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये दिसून येत होती, परंतु आजकाल तरुण मुलींना देखील याचा त्रास होतो.

PCOS Belly: धकाधकीची जीवनशैली (Stressful lifestyle) आणि चुकीची आहार पद्धती (Incorrect Diet) यांमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच यामुळे शरीराच्या अनेक समस्या उद्भवतात. महिलांमध्येही यामुळे विविध आजारांची लक्षणं दिसून येतात. त्यापैकी पीसीओडी, पीसीओएस या काही साधारण समस्या आहेत. 

पीसीओएस (PCOS) म्हणजेच, पॉलीसिस्टिक ओव्हरी (Polycystic Ovary Syndrome) ही आजकाल महिलांमध्ये (Women's Issues) एक सामान्य समस्या आहे. पूर्वी ही समस्या 30-35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये दिसून येत होती, परंतु आजकाल तरुण मुलींना देखील याचा त्रास होतो. यामध्ये निर्माण होणाऱ्या हार्मोनल असंतुलनाचा परिणाम महिलांच्या एकूण आरोग्यावर होतो. यामुळे महिलांची मासिक पाळी (Menstrual Cycle) आणि प्रजनन क्षमताच (Fertility) नाही तर त्यांचे वजन (Weight), मूड (Mood Swing) आणि पचन (Digestion) यासह अनेक गोष्टींवर परिणाम होतो. 

PCOS मध्ये हार्मोनल इनबॅलन्समुळे (Hormonal Imbalance) पोटाची चरबी (Abdominal Fat) वाढतात. पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही घरगुती पदार्थ तुम्ही योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पाण्यात मिसळून प्यायल्यानं नक्की फायदा होतो. तसेच, याशिवाय निरोगी जीवनशैली (Healthy lifestyle), योगासनं (Yoga) आणि व्यायाम (Exercise) या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा तीन पदार्थांबाबत सांगणार आहोत, जे पाण्यात मिसळून प्यायल्यानं PCOS मुळे वाढलेल्या पोटाच्या घेरापासून सुटका मिळते. 

PCOS Belly: PCOS मुळे पोट वाढलंय? पोटाचा घेर कमी करण्यासाठी पाण्यात 'हे' 3 पदार्थ एकत्र करा अन् प्या!

PCOS मुळे वाढलेल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी बडीशेप, मेथीचे दाणे आणि दालचिनीचं पाणी (How Can Reduce Belly Fat Naturally With PCOS)

  • PCOS मुळे तुमच्या पोटोचा घेर वाढला असेल तर, यामागील कारण इन्सुलिन रेजिस्टंस असू शकतं. त्यामुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणात असंतुलन पाहायला मिळतं. ज्यामुळे वजन वाढतं आणि पोटाभोवती चरबी जमा होते.
  • PCOS मध्ये शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होतं, पण त्याचा योग्य वापर होत नाही. त्यामुळे टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.
  • बडीशेपमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतं. त्यामुळे चरबी वितळण्यास मदत होते.
  • यामुळे शरीरातील इन्सुलिन आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.
  • PCOS मध्ये, मेथीचे दाणे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करण्यासाठी आणि फॅट मेटाबॉलिज्म वाढवण्याचं काम करतात.
  • बडीशेप शरीरातील आयर्नचं शोषण वाढवते.
  • दालचिनी इंसुलिन संवेदनशीलता वाढवतं आणि त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स देखील पचनक्रिया सुधारतं.
  • मेथी, बडीशेप आणि दालचिनी हार्मोनल असंतुलन दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
  • हे पाणी प्यायल्यानं पीरियड्सही नियमित होतात आणि पीरियड्समध्ये येणाऱ्या क्लॉट्सही कमी होतात.

PCOS Belly: PCOS मुळे पोट वाढलंय? पोटाचा घेर कमी करण्यासाठी पाण्यात 'हे' 3 पदार्थ एकत्र करा अन् प्या!

कसं तयार कराल?

साहित्य : 

  • मेथीचे दाणे - अर्धा चमचा 
  • दालचिनी पावडर - अर्धा चमचा 
  • बडिशेप - 1 चमचा 

कृती : 

  • सर्व पदार्थ पाण्यात एकत्र करा. 
  • 5 मिनिटांपर्यंत सर्व पदार्थ उकळून घ्या. 
  • उकळल्यानंतर मिश्रण गाळून घ्या. 
  • सकाळी उठल्यावर अनोशापोटी या पेयाचं सेवन करा. 
  • काही दिवसांतच फरक जाणवेल. 

PCOS मुळे वाढलेलं पोट कमी करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. पण तु्म्हाला पीसीओसची लक्षणं जाणवत असतील, तरच हा उपाय करा. तसेच, जर तुम्हाला होणारा त्रास कमी होतच नसेल, तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

PCOS ची लक्षणं काय? 

  • अनियमित मासिक पाळी
  • अधिक रक्तस्राव
  • चेहऱ्यावरील केस वाढणं
  • चेहऱ्यावर पिंम्पल्स 
  • डोकेदुखी
  • वजन वाढणं
  • वागण्यातील बदल 
  • झोप न येणं

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Health Benefits of Poha: सकाळच्या नाश्त्याला भात खाऊ नका, त्याऐवजी पोहे खा; आरोग्यासाठी फायदेच फायदे!

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget