Health Tips : नैसर्गिक मल्टीविटामिन मिळविण्यासाठी 'ही' 5 फळं खा; आरोग्यासाठी ठरतील वरदान
Fruits For Multi Vitamins : मल्टीविटामिन्स आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. शरीरात त्यांची कमतरता असल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं.
![Health Tips : नैसर्गिक मल्टीविटामिन मिळविण्यासाठी 'ही' 5 फळं खा; आरोग्यासाठी ठरतील वरदान Health Tips Fruits For 5 Multi Vitamin rich foods to add to your diet marathi news Health Tips : नैसर्गिक मल्टीविटामिन मिळविण्यासाठी 'ही' 5 फळं खा; आरोग्यासाठी ठरतील वरदान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/26/b96ab09b24c238b918cb32b9de1bc7be1706266809600358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Fruits For Multi Vitamins : आपल्या शरीरात जर जीवनसत्त्वांची (Vitamin) आणि पोषक तत्त्वांची कमतरता असेल तर त्यावर मात करण्यासाठी फळांचं (Fruits) सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, जरी वेगवेगळ्या रंगांच्या फळांमध्ये विविध प्रकारचे जीवनसत्त्वे असतात. पण, अशी अनेक फळे आहेत ज्यात अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात.
नैसर्गिक मल्टीविटामिन्स मिळविण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात अनेक प्रकारची फळे देखील समाविष्ट करू शकता. यामध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समावेश असतो. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही 5 फळांची नावं सांगणार आहोत. ज्यामध्ये अनेक मल्टीव्हिटॅमिन्सचा समावेश असतो.
पेरू
हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात अगदी सहज दिसणाऱ्या पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आढळते. पेरू पचायला अगदी सोपा आहे तसेच यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर करता येते. डोळे निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए महत्वाचे आहे.
स्ट्रॉबेरी
हे फळ थोडे महाग असले तरी अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचा खजिना आहे. यामध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि मॅग्नेशियम आढळते. स्ट्रॉबेरीमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होतो.
पपई
पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम आढळते. हे फळ अनेक चमत्कारी गुणधर्मांनी परिपूर्ण असून पोटालाही अनेक फायदे मिळतात. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे, कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. व्हिटॅमिन सी मुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
किवी
किवीमध्ये तुम्हाला अनेक प्रकारची जीवनसत्त्वे देखील मिळतील. यामध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम आणि फायबर आढळतात. अशा प्रकारे ते तुमच्या शरीरातील अनेक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करते. व्हिटॅमिन ई त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते आणि रक्त परिसंचरण राखण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. व्हिटॅमिन के हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.
बेरीज
ब्लूबेरी, रास्पबेरी आणि क्रॅनबेरी या सर्व प्रकारच्या बेरी शरीरासाठी फायदेशीर आहेत. व्हिटॅमिन बी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. बेरी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फोलेटचा चांगला स्रोत असू शकतात. त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियम देखील कमी प्रमाणात असते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Fitness Tips : अचानक जिम सोडल्यास आरोग्यावर होतात 'हे' परिणाम? नुकसान टाळण्यासाठी 'हे' उपाय करा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)