Health Tips : सावधान! जर तुम्हाला हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असेल; तर 'अशी' घ्या तुमच्या हृदयाची काळजी...
Heart Attack : कुटुंबातील एखाद्याला हृदयविकार, झटका, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा धोका असल्यास हृदयाशी संबंधित आजाराचा धोका वाढतो.
Heart Attack : हृदयविकाराचा झटका (Heart Attack), स्ट्रोक आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर हृदयविकारांचा धोका दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. वातावरणातील बदल, बिघडलेली जीवनशैली आणि कामाचा वाढता ताण हे यामागील कारण मानलं जातं. त्यातही जर तुमचा हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असेल तर अधिकच काळजी घ्यावी लागते. अशा लोकांना हृदयविकाराचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो. तुमच्या कुटुंबात असे कोणी असेल तर नियमित तपासणी करून घेणं आणि जीवनशैलीत काही बदल करणं गरजेचं आहे.
साधारण 50 वर्षांपूर्वी कुटुंबातील एखाद्याला हृदयविकार, झटका, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा धोका असल्यास हृदयाशी संबंधित आजाराचा धोका वाढतो. 'कोरोनरी आर्टरी डिसीज' हा एक अनुवांशिक आजार आहे. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजाराचा कौटुंबिक इतिहास तयार होतो. अशा परिस्थितीत तुम्हाला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला या आजाराचा धोका कसा टाळू शकता येतो या संदर्भात अधिक माहिती सांगणार आहोत.
हृदयविकाराचा धोका कसा कमी करायचा?
मद्यपानापासून दूर राहा
जर तुमच्या कौटुंबिक इतिहासात हृदयविकाराचे रुग्ण असतील तर तुम्ही मद्यपान आणि ड्रग्सपासून दूर राहणंच योग्य ठरेल. मद्यपानाच्या सवयीमुळे यकृत तर कमकुवत होतेच पण पोटाशी संबंधित अनेक आजारही निर्माण होतात.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा
हृदय निरोगी ठेवायचं असेल तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहिल्यास हृदय किंवा पोटाशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत.
तंबाखू खाऊ नका
कौटुंबिक इतिहासात हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा हार्ट फेलियरचा धोका सर्वात जास्त असतो. दररोज तंबाखूचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते. तंबाखू आणि धुम्रपान हृदयासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
दररोज व्यायाम करा
तुम्हाला कोणत्याही आजारापासून दूर राहायचं असेल तर फिटनेसची पूर्ण काळजी घ्या. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम किंवा योगा करा. व्यायाम किंवा योगामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. दररोज किमान 30 मिनिटे योग किंवा व्यायाम करा. यामुळे तुमचं हृदय निरोगी ठेवण्यास मदत होईल.
वजन नियंत्रणात ठेवा
वजन वाढल्याने हृदय, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या समस्यांचा धोका वाढतो. अनुवांशिक कारणांमुळेही हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा वेळी वजन नियंत्रणात ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात ठेवले तर तुम्ही आजारांपासून दूर राहाल.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.