Health Tips : हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेची अँजिओप्लास्टी झाली; जाणून घ्या अँजिओप्लास्टी म्हणजे काय? आणि किती खर्च येतो?
What Is Angioplasty : अँजिओप्लास्टीची प्रक्रिया आणि त्यात समाविष्ट असलेल्या स्टेंटची किंमत प्रत्येक देशात वेगवेगळी ठरवण्यात आली आहे.
What Is Angioplasty : बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) नुकताच हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर अँजिओप्लास्टी (Angioplasty) केली. नुकताच एका चित्रपटाच्या शूटिंगवरून घरी परतलेल्या श्रेयस तळपदेला घरीच हृदयविकाराचा झटका आला होता. ही बातमी ऐकून चाहत्यांना फार धक्का बसला. श्रेयसला रुग्णालयात नेल्यानंतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. हृदयविकाराच्या झटक्यानंतर अँजिओप्लास्टी का केली जाते आणि या शस्त्रक्रियेसाठी किती खर्च येतो या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
अँजिओप्लास्टी म्हणजे काय?
अँजिओप्लास्टी ही खरंतर एक वैद्यकीय शस्त्रक्रिया आहे जी हृदयविकाराच्या झटक्यामुळे ब्लॉक झालेल्या कोरोनरी धमन्या उघडण्यासाठी केली जाते. या प्रक्रियेत, हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्त परिसंचरण ओपन हार्ट सर्जरीशिवाय पुन्हा सुरळीत केले जाते. वैद्यकीय भाषेत, अँजिओप्लास्टीला पर्क्यूटेनियस कोरोनरी इंटरव्हेंशन (PCI) असेही म्हणतात आणि ही शस्त्रक्रिया सामान्यतः हृदयविकाराच्या झटक्यानंतर तातडीने केली जाते. याशिवाय हृदयरुग्णाची स्थिती लक्षात घेऊन वेळ आल्यावर त्याचे डॉक्टरही सल्ला देऊ शकतात. अँजिओप्लास्टीमध्ये, रक्तवाहिनीमध्ये कॅथेटर टाकले जाते आणि अवरोधित धमनी उघडण्याचा प्रयत्न केला जातो. कॅथेटरच्या आतल्या टोकाला एक फुगा असतो आणि कॅथेटर रक्तवाहिनीत गेल्यावर तो फुगवला जातो ज्यामुळे त्याच्या दाबाने रक्ताची गुठळी किंवा प्लेक साफ होतो आणि रक्ताभिसरण पुन्हा पूर्ववत होते.
अँजिओप्लास्टीची किंमत किती आहे?
अँजिओप्लास्टीची प्रक्रिया आणि त्यात समाविष्ट असलेल्या स्टेंटची किंमत प्रत्येक देशात वेगवेगळी ठरवण्यात आली आहे. भारतात, रुग्णाच्या हृदयात ठेवलेल्या स्टेंटची किंमत 10,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान असते. साधारणपणे, स्टेंटची किंमत देखील रुग्णालयानुसार बदलते. सरकारी दवाखान्यात स्टेंटची किंमत कमी असली तरी ती बसवण्याची किंमत खूपच जास्त आहे. जर आपण खाजगी रुग्णालयांबद्दल बोललो तर संपूर्ण अँजिओ प्लास्टीची किंमत 2 ते 3 लाखांच्या दरम्यान येते. भारत सरकारने देशभरात स्टेंटची किंमत निश्चित केली असली तरी त्याची किंमत वेगळी ठेवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )