Health: तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीरात दिसतील आश्चर्यकारक फायदे, कमीत कमी 8 तास..
तांब्यामध्ये अँटी मायक्रोबियल, अँटिऑक्सिडंट, तसेच अनेक शरीराला फायद्याचे गुणधर्म आहेत. नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने काय फायदे होतात?
Drinking water from copper vessel: तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेलं पाणी पिण्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत. आयुर्वेदातही तांब्याच्या भांड्यातील पाण्याला महत्त्व देण्यात आलं आहे. तांब्याच्या भांड्यात कमीत कमी आठ तास ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीरातील अशुद्ध घटक बाहेर पडून यकृत आणि किडनी निरोगी राहण्यास मदत होत असल्यास सांगितलं जातं. तांब्यामध्ये अँटी मायक्रोबियल, अँटिऑक्सिडंट, तसेच अनेक शरीराला फायद्याचे गुणधर्म आहेत. नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने काय फायदे होतात?
पचन संस्था राहते मजबूत
पोट लिव्हर आणि मूत्रपिंडांच्या समस्यांसाठी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. तांब्यात पोट लिव्हर तसेच मूत्रपिंड या अवयवांना डिटॉक्स करण्याचे अनेक गुणधर्म आहेत याने पोटात अल्सर किंवा इन्फेक्शनची समस्या होण्याचा त्रास कमी होत असल्याचं सांगितलं जातं.
संसर्गजन्य आजारांपासून प्रतिबंध
तांब्यात निसर्गतः ऑलिगोडायनिक म्हणून ओळखले जातात. याचाच अर्थ यात बॅक्टेरियांचा नाश करण्याची प्रभावित क्षमता आहे. ज्या बॅक्टेरियांमुळे संसर्गजन्य आजार होतात त्यावर हे पाणी प्रभावी असल्याचा सांगण्यात येतं. नियमितपणे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने गंभीर रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते.
लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त
आजकाल वजन कमी करण्यासाठी नानाविध उपाय केले जात असताना कमी वेळात वजन कमी करण्याचा विचार करणाऱ्यांना तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्यास सांगितलं जातं. यांना पचनक्रिया सुधारते व शरीरातील खराब चरबी लवकर कमी होण्यास मदत होते.
आयुर्वेदात सांगितल्यानुसार किमान आठ तास
केवळ आयुर्वेदातच नाही तर वैज्ञानिक व तज्ञांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिणं फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. पाण्याचा पुरेपूर फायदा तेव्हाच होतो जेव्हा पाणी तांब्याच्या भांड्यात किमान आठ तास ठेवले जाते. रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी सकाळी पिणं फायदाच ठरतं.
थायरॉईडसाठी तांब्याच्या भांड्यातील पाण्याची शिफारस
तांब्यामधील पाणी पिल्याने थायरॉक्सिन हार्मोन्सला संतुलित ठेवण्यास मदत होते. यामुळे थायरॉइडचाही धोका दूर होतो. तसेच तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते. यासाठी रोज सकाळी व संध्याकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. तसेच तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरातील युरीक अॅसिड कमी होण्यास मदत होते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )