Health Care Tips : योगासनांच्या मदतीनं वाढवा वजन; झटपट दिसेल फरक
अनेक लोक वेट गेन करण्यासाठी जिममध्ये जातात. जर तुम्हाला घरच्या घरी वजन वाढवायचे असेल तर तुम्ही हे योगासनं ट्राय करा-
Weight Gain: काही लोकांना वजन कमी असल्यामुळे समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक लोक वेट गेन करण्यासाठी जिममध्ये जातात. जर तुम्हाला घरच्या घरी वजन वाढवायचे असेल तर तुम्ही हे योगासनं ट्राय करा-
चक्रासन (Chakrasana)-
चक्रसन हे दोन शब्दांनी बनलेले आहे –चक्र म्हणजे चाक आणि आसन म्हणजे योग मुद्रा.चक्रासन करताना, शरीराला चाकाचा आकार दिसतो, म्हणून त्याला चक्रासन असे नाव देण्यात आले आहे. चक्रासनामुळे शरीरात ब्लड सर्कुलेशन चांगले होते. चक्रासन करण्याची पद्धत-
-सर्वप्रथम जमिनीवर उताणे झोपा.
-दोन्ही पाय दुमडा.
-पायांमध्ये अंतर ठेवा. दोन्ही हात कोपऱ्यांमध्ये दुमडून डोक्याजवळ ठेवा. आता कमरेपासून डोक्यापर्यंतचा भाग जमिनिपासून वर उचला. डोके शक्य तितके मागे ठेवण्याचा प्रयत्न करा.
पवनमुक्तासन (Pavanmuktasana)-
पोटाचे सर्व विकार दूर करण्यासाठी एक सर्वोत्तम आसन म्हणजे पवनमुक्तासन(Pavanmuktasana). पवन म्हणजे वायू या आसनामुळे आपल्या पोटातील सर्व वायू सहजरित्या बाहेर पडतो म्हणून या आसनाला पवनमुक्तासन असे म्हणतात.
वजन वाढवण्यासाठीचे डाएट
वजन वाढवण्यासाठी 3-4 बदाम, खजूर आणि अंजीर हे सर्व दूधामध्ये टाकून ते दूध उकळवून घ्या. हे दूध रोज प्यावे. त्यामुळे देखील वजन वाढते. रात्री झोपण्याआधी हे दूध प्यावे. वजन वाढवण्यासाठी तुम्हाला 3-4 केळी रोज खाव्या लागतील. केळीमध्ये पोषक तत्त्वे असतात. 1 वाटी दही किंवा दूधासोबत केळी खा. यामुळे तुमचे वजन झटपट वाढेल. रोज मध खाल्याने वजन वाढते. दूधामध्ये एक चमचा मध टाकून प्यावे. सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि रात्री झोपण्याआधी मध टाकलेले दूध प्यावे. यामुळे तुमची पचन शक्ती वाढेल आणि वजन देखील वाढण्यास मदत होईल.
टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Good Health Care Tips : लिंबाचं अतिसेवनही अपायकारक; उद्भवतील 'या' समस्या
- Skin Care Tips: थंडीत त्वचा कोरडी पडते? मध आणि गुलाब पाण्याचा हा फेस पॅक चेहऱ्याला लावा, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत
- Winter Health Care: थंडीत 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करणं ठरेल फायदेशीर; जाणून घ्या फायदे