(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Good Health Care Tips : लिंबाचं अतिसेवनही अपायकारक; उद्भवतील 'या' समस्या
Lemon: लिंबाचे लोणचं म्हणले की अनेकांच्या तोंडाला पाणी सूटते. काही लोक शरीरातील इम्यूनिटी वाढवण्यासाठी लिंबाचे सरबत पितात.
Health side Effects of Lemon: लिंबाचे लोणचं म्हणले की अनेकांच्या तोंडाला पाणी सूटते. काही लोक शरीरातील इम्यूनिटी वाढवण्यासाठी लिंबाचे सरबत (Lemon) पितात. लिंबू पाण्यात शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्वे असतात. लिंबातील फ्लेवोनॉयड्स हे शरीरातील मेटाबोलिज्म वाढवतात. मेटाबोलिज्म वजन कमी करण्यासाठी मदत करतं. योग्य प्रमाणात लिंबाचे सरबत प्यायल्यानं वाढलेलं वजन कमी होते. लिंबामधील गुणधर्म पोटावरील फॅट्स कमी करण्याचं काम करतं. वेगवेगळ्या भाज्यांमध्ये लिंबू पिळून खायला अनेकांना आवडतो. पण लिंबाचे अतिसेवन हे शरीरासाठी अपायकारक आहे.
गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून प्यायल्याने वजन कमी होते, असे अनेकांचे मतं आहे. पण गरम पाण्यात जास्त प्रमाणात लिंबू पिळून प्यायल्याने गॅस्ट्रोओसोफेगल रिफ्लक्स आणि अॅलिड रिफ्लक्स सारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच लिंबाच्या अतिसेवनामुळे पचन क्रिया बिडणे आणि उलट्या होणे इत्यादी त्रास होऊ शकतो.
दात होऊ शकतात खराब
लिंबाच्या अतिसेवनामुळे दातांना त्रास होऊ शकतो. लिंबामध्ये अॅसिड असते.या अॅसिडमुळे दात खराब होऊ शकतात. लिंबू पाणी प्यायल्यानंतर किंवा लिंबाचा कोणताही पदार्थ खाल्यानंतर लगेच ब्रश करणे टाळा. तसेच लिंबू असलेले पदार्थ खाल्यानंतर भरपूर पाणी प्या.
मायग्रेनचा होऊ शकतो त्रास-
लिंबामध्ये टायरामाइनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जर तुम्ही लिंबाचे अतिसेवन केले तर तुम्हाला डोके दुखीचा त्रास होऊ शकतो, तसेच तुम्हाला मायग्रेनचा त्रास देखील होऊ शकतो.
टीप : वरील सर्व उपाय घरगुती असून ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते.
Winter Health Care: थंडीत 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करणं ठरेल फायदेशीर; जाणून घ्या फायदे
Good Health Care Tips : ग्लोइंग अन् हेल्दी स्किन हवीये? घरच्या घरी करा फेशिअल, 'या' स्टेप्स फॉलो करा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )