Winter Health Care: थंडीत 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करणं ठरेल फायदेशीर; जाणून घ्या फायदे
थंडीमध्ये आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीमध्ये शरीर उष्ण ठेवण्यासाठी या पाच गोष्टींचा तुम्ही आहारात समावेश केला पाहिजे.
Winter Superfood : हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्ती खूप कमकुवत होत असते. त्यामुळे थंडीमध्ये आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीमध्ये शरीर उष्ण ठेवण्यासाठी या पाच गोष्टींचा तुम्ही आहारात समावेश केला पाहिजेत.
1. खजूर (Dates)- थंडीमध्ये खजूर खल्याने तुमच्या शरीरातील उष्णता वाढेल, A आणि B हे व्हिटॅमिन खजूरामध्ये असतात. तसेच खजूरामध्ये फॉस्फोरस (Phosphorus), पोटॅशियम (Potassium), कॅल्शियम (Calcium) , मॅग्नीशियम (Magnesium) आणि फाइबर (Fiber) इत्यादींचे प्रमाण जास्त असते. खजुरामध्ये असणाऱ्या अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडमुळं इन्सुलिन, किंवा डायबिटीजमुळं शरीराला चढलेली सूज कमी होण्यास मदत होते.
2. गुळ (Jaggery)- गुळ खाल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म (Metabolism) वाढते. गुळामध्ये आढळून येणारे प्रोटीन्स, व्हिटॅमिन बी, कॅल्शिअम आणि फॉस्परस मानवी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. गुळामुळे शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे थंडीमध्ये गुळाचे सेवन करावे.
3. तिळ- तिळ खाल्याने शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढते. काळे आणि पांढरे तिळ बाजारात मिळतात. तिळामध्ये सॅचुरेटेड फॅटी अॅसिड (Mono-saturated fatty acids) आणि अँटी-बॅक्टीरियल मिनरल्स (Anti-bacterial Minerals) असतात. जे शरीरासाठी महत्वाचे असतात.
4. गाजर (Carrot) - कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, लठ्ठपणा, हाड आणि स्नायूचे विकार अशा अनेक विकारांवर गाजर उपयुक्त ठरतं. गाजरामध्ये A, B,C,D,E, G आणि K व्हिटॅमिन असतात.
5. शेंगदाणे- हिवाळ्यात शेंगदाणे खाल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. तसेच शेंगदाण्यामध्ये मँग्नीज (Manganese), व्हिटॅमिन-E (Vitamin E), फॉस्फोरस (Phosphorus) आणि मैग्नीशियम (Magnesium) इत्यादी पोषक तत्वे असतात. जी शरीरासाठी अत्यंत फायदेशिर असतात.
टीप : वरील सर्व उपाय घरगुती असून ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )