Health Tips : हिवाळ्यात आइस्क्रिम खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
हिवाळ्यात आइस्क्रिम खाणं टाळताय? आता बिनधास्त खा आइस्क्रिम... आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर
नवी दिल्ली : हिवाळ्यात आइस्क्रीम म्हटलं की, नकोचा पाढा सुरू होतो. अनेक लोकांचा असा समज असतो की, हिवाळ्यात आइस्क्रिम खाल्याने सर्दी, खोकला आणि ताप अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हीही असा विचार करत असाल तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण हिवाळ्यात आइस्क्रिम खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया हिवाळ्यात आइस्क्रिम खाण्याचे फायदे...
आइस्क्रिम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. कारण यामध्ये प्रोटीन, कॅलरी आणि व्हिटॅमिन्स आढळून येतात. जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तसेच आइस्क्रिम खाल्याने डोकं शांत राहण्यासही मदत होते. आइस्क्रिम तणाव कमी करण्याचं काम करते. याव्यतिरिक्त आइस्क्रिम शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही मदत करते. त्यामुळे हिवाळ्यात आइस्क्रिमकडे अजिबात दुर्लक्षं करू नका.
आइस्क्रिम खाण्याचे फायदे
तणाव कमी होतो
जर तुम्ही तणावात असाल तर बिनधास्त आइस्क्रिम खा. आइस्क्रिमुळे दिवसभर तणावापासून दूर राहण्यास मदत होते. तसेच डोकं शांत राहण्यासही मदत होते.
प्रोटीनची कमतरता
आइस्क्रिम शरीरामधील प्रोटीनची कमतरता दूर करते. आइस्क्रिम खाल्याने स्नायू मजबूत होतात, तसेच त्वचा उजळण्यासही मदत होते. एवढचं नाहीतर शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर होऊन हाडांना मजबूती मिळते. तसेच नर्वस सिस्टम उत्तम होण्यासोबतच डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठीही मदत होते.
रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी
आरोग्य उत्तम राहण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणं आवश्यक असतं. आइस्क्रिममध्ये व्हिटॅमिन ए, इ2, इ3 आढळून येतं. हे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतं. यामध्ये आढळून येणारं व्हिटॅमिन बी2 आणि बी12 मेटाबॉलिज्म संतुलित ठेवण्यासाठी मदत करतं. तसेच वजन कमी करण्यासाठीही मदत करतं.
ओमेगा 3 आणि व्हिटॅमिन डी
आइस्क्रिममध्ये मुबलक प्रमाणात ओमेगा 3 आणि व्हिटॅमिन डी असतं. जे शरीरासाठी फायदेशीर ठरतं. हे खाल्याने शरीरातील कॅल्शिअम कमी होत नाही.
टीप : वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून असून ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते.