Double Dating : तुमच्या मागे तुमच्या पार्टनरचं काय सुरूये, डबल डेट तर करत नाही ना? 'या' टिप्सनं त्याला रंगेहात पकडा
Double Dating Check Tips : तुम्ही तुमच्या पार्टनरचे सोशल मीडिया प्रोफाईल चेक करू शकता आणि त्यावर तो अजून इतर कुणाला डेट करत आहे का? हे तपासू शकता.
Double Dating Check Tips : डबल डेटिंग (Double Dating) ही एकाच वेळी दोन पार्टनरसोबत प्रेमसंबंध (Love) ठेवण्याची प्रक्रिया आहे. डबल डेटिंगमध्ये लोक एकाच वेळी दोन प्रेमसंबंध प्रस्थापित करतात. या सगळ्यात बहुतेकदा एखाद्या जोडीदाराची फसवणूक होते, आपला पार्टनर आपल्यामागे काय करतो हे अनेकांना माहित नसतं. तुम्हालाही जर तुमच्या जोडीदाराकडून डबल डेटिंगचे संकेत मिळाले तर तुम्ही या प्रकरणाचा छडा लावू शकता.
तुमचा पार्टनर (Partner) तुमची फसवणूक करत असल्याची काळजी तुम्हाला वाटत असेल, पण तुम्हाला त्याचा कोणताही पुरावा सापडत नसेल, तर या सोप्या पद्धती तुम्हाला खूप मदत करू शकतात. कोणतंही नातं पुढे नेण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या खोट्या गोष्टींबद्दल आणि खोट्या वागणुकीबद्दल माहित असलं पाहिजे, तर तुमची होत असलेली मोठी फसवणूक टळू शकते. यासाठी खाली दिलेल्या पद्धतींचा अवलंब करा.
जोडीदाराला कचाट्यात पकडण्यासाठी या गोष्टींचा करा अवलंब
सोशल मीडियावर चेक करा : तुम्ही तुमच्या जोडीदाराचे सोशल मीडिया प्रोफाईल तपासू शकता आणि तो डबल डेटिंग करत आहे का? याचा छडा लावू शकता. त्याचे किंवा तिचे फोटो आणि स्टेटस पाहून तुम्हाला याचे संकेत मिळू शकतात.
मोकळ्या मनाने बोला : जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पार्टनर डबल डेट करत आहे तर तुम्ही त्याच्याशी मोकळ्या मनाने बोलू शकता. सर्व काही समजुतीने घेऊन तुम्ही शांतीत सर्व काही विचारू शकता.
जोडीदाराच्या वागण्याकडे लक्ष द्या : तुमच्या जोडीदाराच्या वागण्याकडे लक्ष द्या. तो किंवा ती त्यांचा वेळ कसा घालवत आहे? ते कोणासोबत आहेत? आणि ते कोणत्या प्रकारच्या क्रियाकलापांमध्ये गुंतलेले आहेत? या सर्वाची माहिती ठेवा.
तुमच्या कॉमन फ्रेंड्सला विचारा : तुमचा पार्टनर दुहेरी डेटिंग करत आहे की नाही हे तुम्ही त्याच्या मित्रांशी बोलून देखील जाणून घेऊ शकता. त्यांनी सांगितलं नाही तर जोडीदाराकडूनच कन्फर्मेशन घ्या.
तुमचा तुमच्या नातेसंबंधावर विश्वास असणे आणि खुल्या मनाने संवाद साधणे महत्त्वाचे आहे. प्रेमसंबंधांत जर तुमची फसवणूक होत आहे, असं तुम्हाला जाणवत असेल आणि ते अशी फसवणूक सहन करण्याची तुमची स्थिती नसेल तर लगेच नात्याला नाही म्हणा आणि अशा नात्यातून बाहेर पडा.
हेही वाचा:
प्रियकराचं डबल डेटिंग, अपमानास्पद वागणूक; प्रियसीने हॉस्टेलमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य!