Diwali 2021: दिवाळीला झटपट मेक-अप करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
दिवाळीला घरीच झटपट मेक-अप करायचा असेल तर ही सोपी ट्रिक नक्की ट्राय करा.
Diwali Mekeup Tips : दिवाळीला लक्ष्मी पूजनाला किंवा पाडव्याला अनेक महिला आणि मुली पार्लरमध्ये जाऊन मेक-अप करतात. पण घरातील पूजेच्या तयारीमुळे अनेकांना मेक-अपसाठी वेळ मिळत नाही. अशा वेळी घरीच झटपट मेक-अप करायचा असेल तर ही सोपी ट्रिक नक्की ट्राय करा.
चेहरा फेसवॉशने धुवा-
दिवाळीला मेक-अप करण्याआधी सर्वप्रथम चेहरा फेस वॉशने धुवा. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जमा झालेली धुळ निघून जाईल आणि चेहऱ्यावरचे पोर्स उघडतील. त्यानंतर स्वच्छ टॉव्हेलने चेहरा पुसून घ्या.
क्रिम किंवा जेल लावा-
चेहऱ्यावर क्रिम न लावता किंवा लोशन न लावता मेक-अप करू नये. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही कोरफडचे जेल देखील लावू शकता. तसेच तुमच्या चेहऱ्याला सूट होणारी क्रिम लावा.
फाउंडेशन लावा-
चेहऱ्यावर क्रिम लावल्यानंतर फाउंडेशन लावावे. तुम्ही स्टिक फाउंडेशनचा वापर करू शकता. त्यानंतर स्पंजला पाण्यामध्ये बुडवून तो स्पंज भिजवून घ्या. ओल्या स्पंजने चेहऱ्यावर फाउंडेशन लावावे.यामुळे तुमच्या चेहऱ्यावर असलेले डाग झाकता येतात.
आयलायनर- फाउंडेशन लावून झाल्यानंतर आयलायनर लावावे. दिवाळीमधील फेस्टिव्हल लूकसाठी डार्क आय मेक-अप चांगला दिसतो. त्यामुळे विंग आयलायनर लावल्याने तुमचा लूक उठून दिसेल. आयलायनर लावल्यानंतर तुम्ही मस्करा देखील लावू शकता.
आयशॅडो- थोडे डार्क कलरचे आयशॅडो फेस्टिव्हल सिझनचा लूक सुंदर करू शकतात. जर तुमच्याकडे आयशॉडो नसेल तर तुम्ही लिप्स्टिकचा वापर आयशॅडो सारखा करू शकता.
लिप्सस्टिक- सर्वात शेवटी लिप्सस्टिक लावावी. मॅट किंवा लिक्विड लिपस्टिकचा वापर तुम्ही करू शकता.
Weight Loss Drink : वजन कमी करण्यासाठी दररोज प्या 1 ग्लास काकडीचा ज्यूस
टिप- वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित