Government Job : सरकारी नोकरीची सुवर्णसधी! संरक्षण मंत्रालयात भरती, लगेच करा अर्ज
MOD Recruitment 2024 : ASC केंद्र, दक्षिणच्या नागरी थेट भरती मंडळाने (CDRB) विविध नागरीकांच्या 71 पदांवरील (Ministry of Defence Recruitment) भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.
Ministry of Defence Recruitment 2024 : संरक्षण मंत्रालयात भरती करण्यात येणार असून भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत बेंगळुरू येथे स्थित ASC केंद्र, दक्षिणच्या नागरी थेट भरती मंडळाने (CDRB) विविध नागरीकांच्या 71 पदांसाठी (Ministry of Defence Recruitment) भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ASC केंद्र, दक्षिणच्या नागरी थेट भरती मंडळाने (CDRB) 3 आचारी (Chef), नागरी केटरिंग इंस्ट्रक्टर 3, 2 MTS चौकीदार, ट्रेडसमन मेट कामगार 8 अशा विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध ASC केंद्रांमध्ये नागरी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Ministry of Defence Recruitment 2024 : रिक्त पदांचा तपशील
नागरी थेट भरती मंडळाने (CDRB) दिलेल्या जाहिरातीनुसार, स्वयंपाकीची (Cook) 3 पदे, सिव्हिलियन केटरिंग इन्स्ट्रक्टरच्या 3, MTS (चौकीदार) 2, ट्रेडसमन मेट (लेबर) 8, व्हेईकल मेकॅनिक 1, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर 9, क्लीनर 4, लीडिंग फायरमनची 1 पदे या विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. याशिवाय, फायरमनची 30 पदे आणि फायर इंजिन ड्रायव्हरच्या 10 पदांवरही भरती करण्यात येणार आहे.
Ministry of Defence Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता, निकष
एएससी सेंटर बंगलोरद्वारे आयोजित नागरी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक (10वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांकडे प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा किंवा रिक्त पदांशी संबंधित ट्रेडमधील अनुभव (पदानुसार बदलतो) असावा.
Ministry of Defence Recruitment 2024 : वयोमर्यादा
संरक्षण मंत्रालय नागरी भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर पदांसाठी कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल, अधिक माहिती आणि इतर तपशिलांसाठी अधिसूचना पाहा.
Ministry of Defence Recruitment 2024 : संरक्षण मंत्रालय नागरी भरतीसाठी अर्ज करा करायचा?
ASC केंद्र, दक्षिण CDRB द्वारे करण्यात येणाऱ्या या नागरी भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार भरतीच्या जाहिरातीसह दिलेल्या अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांनी हा फॉर्म पूर्णपणे भरून त्यासोबत स्वयं-साक्षांकित प्रमाणपत्रांच्या प्रतींसह खाली दिलेल्या पत्त्यांवर पाठवावा लागेल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (दक्षिण) - 2 ATC, Agram Post, बंगळुरु - 07.
या भरतीसाठी 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :