Bank Job : बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती; येथे करा अर्ज
BOB Recruitment 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज दाखल करावा.
Bank of Baroda Recruitment 2024 : सुशिक्षित आहात आणि बँकेत नोकरी (Bank Job) शोधत असाल तर, ही बातमी तुमच्या कामाची आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda Vacancy) नोकरीची संधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज दाखल करावा. यासाठी bankofbaroda.co.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याआधी अधिकृत अधिसूचना नक्की वाचा.
Bank of Baroda Vacancy : बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Vacancy) भरती अंतर्गत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु 19 जानेवारी 2024 पासून सुरु झाली आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट ने पाहता वेळीच अर्ज दाखल करावा.
Bank of Baroda Recruitment 2024 : महत्त्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 19 जानेवारी 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 08 फेब्रुवारी 2024
Bank of Baroda Recruitment 2024 : रिक्त पदांचा तपशील
बँक ऑफ बडोदा भरती मोहिमेअंतर्गत सिक्युरिटी मॅनेजर (Security Manager) म्हणजेच सुरक्षा अधिकारी पदाच्या 38 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
Bank of Baroda Recruitment 2024 : वयोमर्यादा
या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराचे किमान वय 25 वर्ष आणि कमाल वय 35 वर्ष असणे आवश्यक आहे.
Bank of Baroda Recruitment 2024 : अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील अर्जदारांना 600 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तर SC, ST आणि महिला उमेदवारांना अर्जात सवलत देण्यात आली असून त्यांना 100 रुपये भरावे लागतील. भरती संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
Bank of Baroda Recruitment 2024 : भरतीसाठी अर्ज कसा करावा?
- बँक ऑफ बडोदा सुरक्षा अधिकारी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, सर्व उमेदवारांना सर्वप्रथम Bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- यानंतर, करिअर टॅब अंतर्गत करंट ओपनिंगमध्ये जावे लागेल.
- त्यानंतर “सुरक्षा अधिकाऱ्यांची भरती जाहिरात” लिंक वर क्लिक करावं लागेल.
- पुढे अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर अर्ज भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी, संपूर्ण फॉर्म पूर्णपणे तपासा.
- यानंतर फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.