एक्स्प्लोर

Government Jobs :  राज्यात तब्बल अडीच लाख नोकऱ्या रिक्त, अडीच वर्षांत एकही पद भरले नाही, माहिती अधिकारात उघड

Maharashtra Government Jobs :  महाराष्ट्र राज्यात विविध विभागात आणि जिल्हापरिषदमध्ये दोन लाख 40 हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे समोर आलेय.

Maharashtra Govt Recruitment : महाराष्ट्र राज्यात विविध विभागात आणि जिल्हा परिषदमध्ये दोन लाख 40 हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे समोर आलेय. मागील 30 महिन्यापासून एकही रिक्त पद भरले गेलेले नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यातील रिक्त पदासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडे माहिती मागितली होती. यामध्ये 2.40 लाख पदे रिक्त असल्याचे समोर आलेय.

महाराष्ट्र राज्यातील विविध विभाग आणि जिल्हा परिषदअंतर्गत 2.44 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. शासकीय विभाग व जिल्हा परिषदेतील 31 डिसेंबर, 2020 पर्यंतची माहिती उपलब्ध करून दिली. एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यात मंजूर पदांची संख्या10 लाख 70 हजार 840 इतकी आहे. यापैकी 8 लाख 26 हजार 435 ही पदे भरलेली आहेत. तर 2 लाख 44 हजार 405 इतकी पदे रिक्त असल्याचे समोर आलेय. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य सरकारकडे 14 जून 2023 रोजी अर्ज सादर करत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व वर्गातील एकूण पदांची माहिती, मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती मागितली होती. सामान्य प्रशासन विभागाने अनिल गलगली यांना गटनिहाय शासकीय व जिल्हा परिषदेतील गट अ, ब, क आणि ड मधील दिनांक 31 डिसेंबर 2020 यापर्यंतची माहिती उपलब्ध करुन दिली. एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हापरिषद यात मंजूर पदांची संख्या 10, 70,840 इतकी आहे. ज्यापैकी 8,26,435 ही पदे भरलेली आहेत. तर 2,44,405 ही पदे रिक्त आहेत. यात शासकीय कर्मचाऱ्यांची 192425 तर जिल्हापरिषदेच्या 51980 अशी एकूण 244405 पदे रिक्त आहेत. 

कोणत्या विभागात किती पदे रिक्त ? - 

गृह विभागाची एकूण मंजूर पदे 2,92,820 असून त्यापैकी 46,851 पदे रिक्त आहेत. 
सार्वजनिक आरोग्य विभागाची एकूण मंजूर पदे 62,358 असून त्यापैकी 23,112 पदे रिक्त आहेत. 
जलसंपदा विभागाची एकूण मंजूर पदे 45,217असून त्यापैकी 21,489 पदे रिक्त आहेत. 
महसूल व वन विभागाची एकूण मंजूर पदे 69,584 असून त्यापैकी 12,557 पदे रिक्त आहेत. 
उच्च व तंत्र विभागाची एकूण मंजूर पदे 12,407 असून त्यापैकी 3,995 पदे रिक्त आहेत. 
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाची एकूण मंजूर पदे 36,956 असून त्यापैकी 124,23 पदे रिक्त आहेत. 
आदिवासी विकास विभागाची एकूण मंजूर पदे 21,154 असून त्यापैकी 6213 पदे रिक्त आहेत. 
शालेय शिक्षण व क्रिडा विभागाची एकूण मंजूर पदे 7050 असून त्यापैकी 3828 पदे रिक्त आहेत. 
सार्वजनिक बांधकाम विभागाची एकूण मंजूर पदे 21,649 असून त्यापैकी 7751 पदे रिक्त आहेत. 
सहकार पणन विभागाची एकूण मंजूर पदे 8867 असून त्यापैकी 2933 पदे रिक्त आहेत. 
सामाजिक न्याय विभागाची एकूण मंजूर पदे 6573 असून त्यापैकी 3221 पदे रिक्त आहेत. 
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाची एकूण मंजूर पदे 8197 असून त्यापैकी 3686 पदे रिक्त आहेत. 
वैद्यकीय शिक्षण विभागाची एकूण मंजूर पदे 36956 असून त्यापैकी 12423 पदे रिक्त आहेत. 
वित्त विभागाची एकूण मंजूर पदे 18191 असून त्यापैकी 5719 पदे रिक्त आहेत. शालेय शिक्षण विभागाची एकूण मंजूर पदे 7050 असून त्यापैकी 3828 पदे रिक्त आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाची एकूण मंजूर पदे 8308 असून त्यापैकी 2949 पदे रिक्त आहेत. 
महिला व बालविकास विभागाची एकूण मंजूर पदे 3936 असून त्यापैकी 1451 पदे रिक्त आहेत. 
विधि व न्याय विभागाची एकूण मंजूर पदे 2938 असून त्यापैकी 1201 पदे रिक्त आहेत. 
पर्यटन व सांस्कृतिक विभागाची एकूण मंजूर पदे 735 असून त्यापैकी 386 पदे रिक्त आहेत. 
सामान्य प्रशासन विभागाची एकूण मंजूर पदे 8795 असून त्यापैकी 2325 पदे रिक्त आहेत. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena and NCP MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
PM Modi In AKola : महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Speech Akola : नेहरूंपासून आजपर्यंत काँग्रेसने बाबासाहेबांना अपमानित केलं; मोदींचा घणाघातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM :  9 नोव्हेंबर 2024: ABP MajhaPrashant Bamb Sabha : बंब यांच्या सभेत गोंधळ , प्रश्न विचारणाऱ्याला धक्काबुक्कीAvinash Jadhav on Sanjay Raut : बाळासाहेबांनी काँग्रेसबाबत काय सांगितलं ते राऊत विसरले ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena and NCP MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
PM Modi In AKola : महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Jayant Patil on Ajit Pawar : पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
D. K. Shivakumar : महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; पीएम मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Embed widget