Avinash Jadhav on Sanjay Raut : बाळासाहेबांनी काँग्रेसबाबत काय सांगितलं ते राऊत विसरले ?
Avinash Jadhav on Sanjay Raut : बाळासाहेबांनी काँग्रेसबाबत काय सांगितलं ते राऊत विसरले ?
हेही वाचा :
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी देवळाली विधानसभा मतदारसंघात (Deolali Assembly Constituency) नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने विद्यमान आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. मात्र शिवसेना शिंदे गटाने राजश्री अहिरराव (Rajshree Ahirrao) यांना विशेष विमानाने एबी फॉर्म पाठवला होता. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अहिरराव यांचा अर्ज मागे घेण्यासाठी शिंदे गटाने प्रयत्न केले होते. मात्र राजश्री अहिरराव नॉट रिचेबल असल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता देवळाली विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे. देवळाली मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चविषयक पहिली तपासणी ही खर्च निरीक्षक डॉ. पेरीयासामी एम. यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहातील शिवनेरी सभागृहात पार पडली. या खर्च तपासणीसाठी सर्व 12 उमेदवार उपस्थित होते. प्रथम तपासणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी 4 लाख 83 हजार 384, वंचितच्या डॉ. अविनाश शिंदे यांनी 4 लाख 61 हजार 116 तर शिवसेना ठाकरे गटाच्या योगेश घोलप यांनी 4 लाख 37 हजार 796 तर शिवसेनेच्या राजश्री अहिरराव यांनी 1 लाख 19 हजार 408 इतका खर्च नोंदविला आहे.