(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पगार 55000, शिक्षणाची अट फक्त 10 वी पास, सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी
सरकारी नोकरी (Government Job) करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी अट फक्त 10 वी पासची असणार आहे.
Government Job News : सरकारी नोकरी (Government Job) करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी अट फक्त 10 वी पासची असणार आहे. झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशनने (jharkhand SSC) फील्ड वर्करच्या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत. या पदासांठी 1 ऑगस्ट 2024 पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता आहे आणि या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे त्यांनी अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करावेत. रिक्त जागांसाठी फक्त नोटीस जारी करण्यात आली आहे, अर्जाची लिंक अद्याप open झाली नाही. 1 ऑगस्टपासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 आहे. तुम्ही पुढील महिन्यापासून या भरतीसाठी फॉर्म भरू शकता.
रिक्त जागा किती?
या भरती मोहिमेद्वारे एकूण 510 फील्ड वर्कर पदांची भरती केली जाणार आहे. ही पदे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि कुटुंब कल्याण विभागांतर्गत आली आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. jssc.nic.in. वेबसाईटवर तुम्ही सविस्तर माहिती मिळवू शकता.
अर्ज करण्यासाठी पात्रता काय?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, त्याचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे. 1 ऑगस्ट 2024 पासून वयाची गणना केली जाईल. आरक्षित वर्गाला नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल. या पदांसाठी उमेदवारांची निवड झारखंड फील्ड वर्कर स्पर्धा परीक्षा 2024 द्वारे केली जाईल. परीक्षेची तारीख अजून आलेली नाही. याबाबत माहिती मिळवण्यासाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट तपासत राहा.
शुल्क किती?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य, BC, EBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी आणि एसटी प्रवर्गासाठी 50 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
या पदांसाठी किती मिळणार पगार?
JSSC फील्ड वर्कर पदांवर निवडल्यास, उमेदवारांना 18,000 रुपये ते 56,900 रुपये मासिक वेतन मिळेल. अर्ज करण्यासाठी, प्रथम आयोगाच्या अधिकृत वेबसाइट jssc.nic.in वर जा.येथे तुम्हाला JFWCE-2024 नावाची ऍप्लिकेशन लिंक दिसेल, लिंक सक्रिय झाल्यानंतर हे होईल. त्यावर क्लिक करा.असे केल्याने एक नवीन पेज उघडेल. यावरुन तुम्ही अर्ज करा. त्यापूर्वी नोंदणी करा. त्यावरून मिळालेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. आता आवश्यक तपशील प्रविष्ट करा, कागदपत्रे संलग्न करा आणि फॉर्म सबमिट करा. शेवटी फी जमा करा आणि फॉर्मची प्रिंट काढा.
महत्वाच्या बातम्या: