एक्स्प्लोर

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! बँकेत 9995 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे काही तास

सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. ग्रामीण बँकेत (Grameen Bank) 9995 पदांसाठी भरती निघाली आहे.

Sarkari Naukri: सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. ग्रामीण बँकेत (Grameen Bank) 9995 पदांसाठी भरती निघाली आहे. विविध पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे काही तासच उरले आहेत. 

बँकिंग कर्मचारी निवड संस्थेने फार पूर्वी प्रादेशिक ग्रामीण बँकेसाठी 9 हजारांहून अधिक पदांची भरती निघाली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया खूप दिवसांपासून सुरु होती. आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अशा परिस्थितीत जे उमेदवार पात्र व इच्छुक असूनही काही कारणास्तव आजतागायत अर्ज करू शकले नाहीत, त्यांनी आज शेवटची संधी आहे.

ibps.in.वरुन तुम्ही अर्ज करु शकता

IBPS RRB च्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला Institute of Banking Personnel Selection च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. ibps.in. येथून तुम्ही केवळ अर्जच करू शकत नाही तर या रिक्त पदांचे तपशील देखील जाणून घेऊ शकता. 7 जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. आज 27 जून 2024 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, या भरती  प्रक्रियेद्वारे एकूण 9995 पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाईल. ही पदे विविध ग्रामीण बँकांसाठी असून त्याद्वारे विविध पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. जसे ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल – I, ऑफिसर स्केल 2, ऑफिसर स्केल 3. या अंतर्गत, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, सीनियर मॅनेजर इत्यादी पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाते. दरम्यान, 43 बँका या भरती मोहिमेत सहभागी आहे. निवडीनंतर, उमेदवारांना त्यापैकी कोणत्याहीमध्ये नियुक्त केले जाऊ शकते. परीक्षेच्या अनेक टप्प्यांनंतर निवड होते.

अर्ज करण्यासाठी पात्रता काय?

कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. पदानुसार वयोमर्यादा वेगळी आहे. उदाहरणार्थ, ऑफिसर स्केल III साठी, उमेदवाराचे वय 21 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. अधिकारी स्केल II पदासाठी, वयोमर्यादा 21 ते 32 वर्षे आहे, तर अधिकारी स्केल I पदासाठी, वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे. त्याचप्रमाणे कार्यालयीन सहाय्यक बहुउद्देशीय पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे. आरक्षित वर्गाला सूट मिळेल. पात्रतेशी संबंधित अधिक तपशील आहेत, ज्याची माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या नोटीसवरून मिळू शकते.

दोन टप्प्यात परीक्षा, काही पदांसाठी मुलाखतही घेतली जाणार

दोन टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. प्रथम पूर्व परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झालेले उमेदवारच पुढच्या टप्प्यात जातात. काही पदांसाठी मुलाखतीही घेण्यात येणार आहेत. पहिले दोन टप्पे यशस्वीपणे पूर्ण करणारेच या पायरीवर पोहोचतील.

किती मिळणार पगार?

या पदांवर निवड केल्यास वेतनही पदानुसारच असते. उदाहरणार्थ, लिपिक पदासाठी 15 ते 20 हजार रुपये, अधिकारी स्केल I पीओ पदासाठी 29 ते 33 हजार रुपये, स्केल II पदासाठी 33 ते 39 हजार रुपये आणि स्केल III पदासाठी 38 ते 44 हजार रुपये दिले जातील. अर्ज करण्यासाठी, सामान्य श्रेणी, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, PWBD उमेदवारांना 175 रुपये शुल्क भरावे लागेल.

महत्वाच्या बातम्या:

SSC CGL Job 2024 : पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; SSC मध्ये 17000 हून अधिक रिक्त पदांवर भरती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : शेजाऱ्यांशी वादाच्या रागातून 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
रागाच्या भरात 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Case : तीन दिवसांनी बनवलेला शवविच्छेदन अहवाल खोटा, दिशाच्या वडिलांचा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 27 March 2025Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, तीन आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली; आरोपी घुले काय म्हणाला?Job Majha : बँक ऑफ बडोदा नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती? 27 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : शेजाऱ्यांशी वादाच्या रागातून 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
रागाच्या भरात 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Embed widget