(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Government Job : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! स्टेनोग्राफर, क्लर्क पदांवर 4500 हून अधिक पदांवर बंपर भरती
Bombay High Court Job Vacancy 2023 : मुंबई हायकोर्टाकडून 4629 रिक्त जांगावर भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करु शकतात.
Bombay High Court Recruitment 2023 : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबई हायकोर्टाकडून (Bombay High Court) 4500 हून अधिक पदांवर बंपर भरती सुरु आहे. या भरतीअंतर्गत 4629 रिक्त जांगावर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयातील स्टेनोग्राफर ग्रेड-3, ज्यूनियर क्लर्क आणि शिपाई अशा विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवारी, 4 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकराच लवकर अर्ज दाखल करत या सुवर्णसंधीचा लाभ घ्या. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर आहे.
Bombay High Court Recruitment 2023 : रिक्त पदांची संख्या
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 4629 पदे भरण्यात येणार असून, त्यापैकी 2795 पदे कनिष्ठ लिपिक, 1266 पदे शिपाई आणि 568 पदे लघुलेखक म्हणजेच पदासाठी आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 18 वर्षे ते 38 वर्षे आहे.
Bombay High Court Recruitment 2023 : पगार किती?
- स्टेनोग्राफर (ग्रेड-3) - 38,600 रुपये ते रु. 1,22,800 रुपये प्रति महिना
- कनिष्ठ लिपिक - 19,900 रुपये प्रति महिना ते 63,200 रुपये प्रति महिना
- शिपाई/हमाल - 15,000 रुपये प्रति महिना ते 47,600 रुपये
Bombay High Court Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता
BHC Recruitment 2023 : शिपाई
मुंबई उच्च न्यायालयात शिपाई पदासाठी उमेदवार सातवी उत्तीर्ण आणि निरोगी असणं आवश्यक आहे.
BHC Recruitment 2023 : कनिष्ठ लिपिक
उमेदवार पदवी उत्तीण असणं आवश्यक आहे आणि उमेदवाराला जिल्ह्यातील न्यायालयाची स्थानिक भाषा माहित असणं आवश्यक आहे.
सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेण्यात आलेली परीक्षा किंवा संगणक टायपिंग बेसिक कोर्स (GCC-TBC किंवा ITI) मधील सरकारी प्रमाणपत्र मराठीत 40 शब्द प्रति मिनिट या वेगाने उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. किंवा अधिक इंग्रजी टायपिंग आणि 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड आवश्यक आहे.
एमएस व्यतिरिक्त, विंडोज आणि लिनक्समधील वर्ड प्रोसेसरचे ज्ञान सिद्ध करण्यासाठी संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मे. कार्यालय, एम.एस. Word, WordStar-7 आणि Open Office Org.
BHC Recruitment 2023 : स्टेनोग्राफर (ग्रेड-3)
पदवीधर आणि जिल्ह्यातील न्यायालयाच्या स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे. सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेल्या परीक्षेसाठी किंवा संगणक टायपिंग बेसिक कोर्स (GCCTBC किंवा ITI) मधील सरकारी प्रमाणपत्र 100 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक इंग्रजी शॉर्टहँडमध्ये आणि 80 wpm प्रति मिनिट, किंवा त्याहून अधिक मराठी शॉर्टहँडमध्ये आणि 40 शब्द प्रति इंग्रजी टायपिंगमध्ये मिनिट किंवा त्याहून अधिक आणि मराठी टायपिंगमध्ये प्रति मिनिट 30 शब्द किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. एमएस व्यतिरिक्त, विंडोज आणि लिनक्समधील वर्ड प्रोसेसरचे ज्ञान सिद्ध करण्यासाठी संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मे. कार्यालय, एम.एस. Word, WordStar-7 आणि Open Office Org.
Bombay High Court Recruitment 2023 : अर्ज शुल्क
या भरतीसाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. तर इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना 900 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.