AIIMS Recruitment 2022 : एम्समध्ये नोकरीची संधी, प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांवर भरती
AIIMS Recruitment 2022 : या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापिठातून एमबीबीएस शिक्षण पूर्ण झालेलं असावं. अर्ज कुठे आणि कसा करायचे जाणून घ्या.
AIIMS Faculty Recruitment 2022 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (All India Institute of Medical Sciences) म्हणजेच एम्समध्ये (AIIMS) नोकरीची संधी आहे. एम्समध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. एम्सकडून भरतीची नवीन अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एम्स राजकोटमध्ये विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीअंतर्गत प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक अशा एकूण 35 पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार aiimsrajkot.edu.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात.
महत्त्वाच्या तारखा
इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज दाखल करावा. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 29 जुलै रोजी सुरु करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीअंतर्गत विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे पात्रतेचे निकष आहेत. यासाठीच्या अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना पाहू शकतात.
वयाची अट
एम्समधील भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे कमाल वय 50 वर्षांपर्यत असावे, त्याहून अधिक वय असून नये.
अर्ज कसा कराल? जाणून घ्या
- उमेदवार येथे सांगितलेल्या प्रकारे अर्ज दाखल करु शकतात.
- यासाठी पहिल्यांदा तुम्हाला aiimsrajkot.edu.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर होम पेजवरील संबंधित भरतीचा पर्याय निवडा.
- नवीन पेज सुरु झाल्यानंतर नोंदणी करा.
- नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करा.
- आता अर्जामध्ये आवश्यक आणि योग्य माहिती भरून अर्ज दाखल करा.
- अर्जाचे शुल्क भरा.
- गरजेनुसार तुम्ही अर्ज डाऊनलोड करून प्रिंट काढू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Pune Government Job : पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी, 400 हून अधिक पदांसाठी भरती, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
- Job Majha : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, नागपूर विद्यापीठात नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक माहिती
- HAL Recruitment 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षा न देता मिळेल नोकरी, येथे करा अर्ज