Pune Government Job : पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी, 400 हून अधिक पदांसाठी भरती, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिकेने 400 हून अधिक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी आहे आणि कोणत्या वेबसाइटवरून अर्ज करायचा ते जाणून घ्या.
Pune Municipal Corporation Recruitment 2022 : पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आली आहे. पुणे महानगरपालिकेत 448 विविध पदे (PMC Recruitment 2022) आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 जुलै 2022 पासून सुरू झाली आहे. तुम्ही PMC च्या या पदांसाठी देखील अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर शेवटच्या तारखेआधी अर्ज करा. इच्छुक उमेदवार pmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करु शकतात.
या पदांवर होणार भरती
या भरती मोहिमेद्वारे एकूण 448 पदांवर भरती करण्यात येणार आहे. ज्यामध्ये सहायक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता, सहायक अतिक्रमण निरीक्षक आदी पदांचा समावेश आहे. हे देखील जाणून घ्या की या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
पुणे महानगरपालिकेतील भरतीअंतर्गत या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. प्रत्येक पदाबद्दल अधिक तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी अधिकृत वेबसाइट पाहा. या भरतीसाठी किमान वय 18 वर्षे ते कमाल 38 वर्षे आहे.
अर्जाचं शुल्क
पुणे महानगरपालिकेतील भरतीअंतर्गत या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 1000 रुपये अर्जाचे शुल्क भरावे लागेल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या पदांवरील उमेदवारांची निवड लेखी चाचणी, मुलाखत, टायपिंग चाचणी, कागदपत्र पडताळणी इत्यादीद्वारे केली जाईल. या पद आणि भरतीबद्दल अधिक तपशील पाहण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.