(Source: ECI/ABP News/ABP Majha)
HAL Recruitment 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षा न देता मिळेल नोकरी, येथे करा अर्ज
HAL Bharti 2022 : हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक विभागात आयटीआय ट्रेडमध्ये 455 पदांवर नोकरीची संधी आहे. यासाठी 10 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
HAL Recritment 2022 : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) द्वारे अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडकडून जारी करण्यात आलेल्या भरती अंतर्गत 455 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना hal.india.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल. या भरतीसाठी उमेदवारांना 10 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. अवघे काहीच दिवस शिल्लक आहे. इच्छुक उमेदवारांना शेवटच्या तारखेची वाट न पाहता लगेच अर्ज दाखल करावा. या पदांवर उमेदवारांची भरती गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल.
कई पदों पर भर्ती निकाली गई है. जिसके लिए उम्मीदवार आधिकारिक साइट hal.india.co.in पर जाकर आवेदन कर सकते हैं. नोटिफिकेशन के अनुसार 455 आईटीआई ट्रेड अपरेंटिस के लिए आवेदन मांगे गए हैं. आवेदन करने की लास्ट डेट 10 अगस्त, 2022 है.कैंडिडेट का सिलेक्शन मेरिट के आधार पर किया जाएगा.
रिक्त जागांचा तपशील
एकूण रिक्त जागा : 455
फिटर : 186
टर्नर : 28
मशीनिस्ट : 26
कारपेंटर : 4
मशीनिस्ट (ग्राइंडर) : 10
इलेक्ट्रिशियन : 66
ड्रॉफ्ट्समॅन (मेकॅनिकल) : 6
इलेक्ट्रॉनिक्स (मेकॅनिक) : 8
पेंटर : 7
शीट मेटल वर्कर : 4
मेकॅनिक (मोटर व्हेइकल) : 4
कंप्यूटर ऑपरेटर (COPA) : 88
वेल्डर (गैस एवं इलेक्ट्रिक) : 8
स्टेनोग्राफर (इंग्लिश) : 6
फ्रिज/एसी मेकॅनिक : 4
अशी असेल निवड प्रक्रिया
या भरती अंतर्गत 455 पदांवरील उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. उमेदवारांचं डॉक्यूमेंट वेरिफिकेशन केलं जाईल. यामध्ये निवडलेल्या उमेदवारांची घोषणा सप्टेंबर महिन्यात केली जाईल. आवश्यक असल्यास उमेदवाराची निवड लेखी चाचणी किंवा मुलाखतीच्या आधारे केली जाऊ शकते. अधिक तपशीलांसाठीउमेदवार अधिकृत वेबसाइट hal.india.co.in वर जाऊन संपूर्ण तपशील ऑनलाइन तपासू शकतात.