Sri Lanka Crisis: भारतासाठी श्रीलंका भौगोलिकदृष्ट्या कसा महत्त्वाचा? भारतानं त्याला कसा प्रतिसाद दिला?
Sri Lanka Crisis: श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेत अन्नधान्य, इंधनाची भीषण टंचाई आहे.
Sri Lanka Crisis: श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेत अन्नधान्य, इंधनाची भीषण टंचाई आहे. आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेच्या या कठिण काळात भारत संकटमोचन म्हणून धावला आहे. भारताकडून श्रीलंकेला सर्वतोपरी मदत केली जात आहे. श्रीलंकेला मदत करून भारतानं सार्क (नेपाळ, मालदीप बांग्लादेश) देशांना महत्वाचा संदेश दिलाय.
सार्क देशांमध्ये चीनचा प्रभाव वाढताना दिसत आहे. याचा फटका भारतालाही बसत आहे. तामिळनाडूमध्ये श्रीलंकेतील आश्रयवादी लोकांची संख्या वाढू लागलीय. भारत अनेकदा श्रीलंकेच्या मदतीसाठी धावून गेलाय. मात्र, यावेळी श्रीलंकेवर आलेलं आर्थिक संकट याआधीच्या तुलनेत खूप मोठं आहे. परंतु, भारतानं पाऊल मागं न घेता श्रीलंकेला बाहेर काढण्यासाठी सक्रीय मदत केलीय
चीनमुळं श्रीलंकेवर कर्जाचा डोंगर
श्रीलंकेतील राजकीय अस्थिरतेमागे चीनच्या कर्जाचा सापळा हे एक महत्त्वाचे कारण मानलं जातंय. चुकलेली शेतीची धोरणे, कोरोनाचा प्रादुर्भाव व पर्यटनाला बसलेला फटक्यापासून हंबनटोटासारख्या फसलेल्या प्रकल्पांपर्यंत सर्वांचं विश्लेषण होत आहे. श्रीलंकेमध्ये आर्थिक आणि राजकीय आघाड्यांवर उलथापालथ होण्याला चीनच्या कर्जाच्या डोंगराचं मुख्य कारण असल्याचंही दिसून आलं आहे.
भारतासाठी श्रीलंका भौगोलिकदृष्ट्या किती महत्वाचा?
चीन आणि श्रीलंकेचे आर्थिक संबंध आहेत. तसेच भारत आणि श्रीलंका यांच्यातही चांगले संबंध आहेत. श्रीलंकेसोबतचे भारताचे सांस्कृतिक आणि समाजिक संबंध फार जुने आहेत. परंतु, मागील दोन दशकांपासून चीनचा श्रीलंकेमधील प्रभाव झपाट्यानं आणि मोठ्या प्रमाणात वाढू लागलाय. ज्यामुळं भारताला भविष्यात अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
कर्जाच्या दबावाखाली भारत शेजारील देशांवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न
महिंद्रा राजपक्षे कुटुंब श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर सत्ता स्थापन केली. याचदरम्यान, चीननं भारताला घेरण्यासाठी भारताशेजारील देशानं जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. चीननं भारताजवळील देशांना कर्ज देऊन त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
सिंहला भाषेला राष्ट्रीय भाषा घोषित
श्रीलंकेत सिंहला आणि तामिळ अशा दोन भाषा बोलणारे लोक राहतात. तामिळच्या तुलनेत सिंहलाची लोकसंख्या अधिक आहे. महिंदा राजपक्षे यांनी सिंहलाला राष्ट्रीयत्व दिलं. दरम्यान, महिंदा राजपक्षे यांनी एलटीटीईच्या विरोधात लढा पुकारला. त्यावेळी चीननं महिंदा राजपक्षे यांना खूप मदत केली. त्यानंतर श्रीलंका आणि चीनचं संबंध वाढले. त्यानंतर चीननं विमानतळ आणि बंदरात गुंतवणूक वाढवली. एकप्रकारे चीननं श्रीलंकेला कर्जात अडकवलं.
श्रीलंकेला आर्थिक संकटातून काढण्यासाठी भारताची धाव
चीनच्या कर्जामुळं अडकलेल्या श्रीलंकेची जी अवस्था झाली, तिच अवस्था भारताजवळील इतर देशांची होऊ नये म्हणून भारतानं श्रीलंकेला मदतीचा हात दिला. तसेच कठीण काळात आपल्या मित्र देशांच्या मदतीला धावून भारतानं जगासमोर आदर्श ठेवलाय.
हे देखील वाचा-