एक्स्प्लोर

Crypto Tax In India: भारतात क्रिप्टो टॅक्स : नियंत्रण की खबरदारी? 

Crypto Tax In India: 2022-23 च्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय मंत्री  निर्मला सीतारमण यांनी व्हर्च्युअल डिजिटल चलनावर (VDA) कर लावण्यात आल्याची घोषणा केली.

India At 2047 : क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर भारतामध्ये 30 टक्के कर लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. क्रिप्टोकरन्सी, नॉन-फंजीबल टोकन(NFT) आणि यासारख्या इतर घटकांना भारतामध्ये व्हर्च्युअल डिजिटल चलनामध्ये (VDA) जोडण्यात आले आहे. एप्रिल 2022 पासून अशा चलनाला कठोर कर व्यवस्थेचा समाना करावा लागत आहे. सर्व प्रकारच्या करांचा सामना करावा लागत असल्यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय अनेकांना कठोर वाटत असेल. पण केंद्र सरकारच्या या निर्णायामुळे क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूकीपासून सावध करत आहे. मोठ्या प्रमाणात रिटर्न्स मिळण्याच्या आशेमुळे अनेकजण क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना हा सावधान करते. मेहनतीची कमाई किप्टोकरन्सीसारख्या अभासी चलनात गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा नक्कीच विचार केला जात असेल. मोठ्या प्रमाणावर परतावा मिळत असल्यामुळे होणारी गुंतवणूक मर्यादीत होणार होत आहे. केंद्र सरकारच्या निर्णायामुळे अभासी चलनातील फसवणूक टाळण्यासाठी महत्वाचं आहे. भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीवर टॅक्स लावण्याचा निर्णय महत्वाचा आहे.. इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये टॅक्स लावणं का गरजेचं आहे ते पाहूयात... 

भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीवर किती टॅक्स आहे? 
2022-23 च्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय मंत्री  निर्मला सीतारमण यांनी व्हर्च्युअल डिजिटल चलनावर (VDA) कर लावण्यात आल्याची घोषणा केली. क्रिप्टोकरन्सी, नॉन-फंजीबल टोकन(NFT) यासह इतर व्हर्च्युअल डिजिटल चलनातून मिळणाऱ्या उत्पादनावर 30 टक्के कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यामध्ये सरकारने कोणतीही सूट दिली नाही. एखाद्या करदात्याचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले तरीही त्याला क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या फायद्यावर 30 टक्के कर भरावाच लागेल. इतकेच नाही तर सर्व व्हर्च्युअल डिजिटल चलनाच्या व्यावहारावर एक टक्के टीडीएसही लावण्यात आला आहे, जो क्रिप्टो एक्स्चेंजच्या खरेदी-विक्रीवर आकारण्यात येतो. 
 
इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये टॅक्स सिस्टम कशी आहे?
अमेरिकामध्ये, क्रिप्टोकरन्सीवर कॅपिटल गेन टॅक्स लागतो, म्हणजेट जसे की शेअर्सच्या नफ्यावर टॅक्स लागतो. अमेरिकेत शून्य ते 37 टक्केंपर्यंत  क्रिप्टोकरन्सीवर कॅपिटल गेन टॅक्स आकारला जातो. उदाहरणार्थ, तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये 100 डॉलरची गुंतवणूक केली आणि 120 डॉलरला विकले तर तुम्हाला 20 डॉलरवर कॅपिटल गेन टॅक्स लागतो. युनायटेड किंग्डममध्ये अमेरिकाप्रमाणेच कॅपिटल गेन टॅक्स स्ट्रक्चर आहे. त्यासोबतच येथे 12,300 पाऊंडपर्यंत क्रिप्टोवर टॅक्सवर सूट देण्यात आली आहे. 

असे अनेक देश आहेत जे क्रिप्टोकरन्सीवरील कर हे टॅक्सचं आश्रयस्थान म्हणून त्यांना पाहिलं जाते.  जर्मनीमध्ये क्रिप्टोकरन्सीला करेन्सी, कमोडिटी अथवा स्टॉक्स मानले जात नाही, तर याला खासगी पैसे म्हणून पाहिले जाते.  जर तुम्चयाकडे एक वर्षापेंक्षा जास्त क्रिप्टोकरेन्सी असेल तर तुम्हाला टॅक्स रिटर्न घोषीत करण्याची गरज नाही. तसेच क्रिप्टोकरन्सीच्या नफ्यावरही कोणताही कर आकारला जात नाही. जर तुम्ही एका वर्षाच्या आत क्रिप्टोची विक्री केली तर तुम्हाला 600 युरो पर्यंतच्या नफ्यावर कोणताही टॅक्स आकारला जात नाही. पण व्यावसायिकांना क्रिप्टोच्या नफ्यावर कॉरपोरेट टॅक्स द्यावा लागतो. याप्रमाणेच बरमुडामध्ये क्रिप्टोकरेन्सीवर कोणताही टॅक्स नाही. 
 
भारतात क्रिप्टो टॅक्स : नियंत्रण की खबरदारी? 
काही देशांच्या तुलनेत भारताली क्रिप्टोवरील टॅक्स सिस्टम शिथिल वाटतेय. तर अन्य काही देशांच्या तुलनेत कठोर दिसतेय. भारतामध्ये जेव्हा क्रिप्टोवर टॅक्स लावण्याची घोषणा करण्यात आली तेव्हा व्यापारी आणि गुंतवणूकदारांनी याचं स्वागत केले होते. कारण, याकडे केंद्राकडून डिजिटल मालमत्तेला कायदेशीर मान्यता दिली म्हणून पाहिले गेले.

भारतामध्ये लवकरच सेंट्रल बँक डिजिटल करेन्सीची (CBDC) सुरुवात केली जाणार आहे. सेंट्रल बँक डिजिटल करेन्सी एक पद्धतीने करेन्सीचा व्हर्युचल फॉर्म आहे. याबाबत आरबीआयकडून डिजिटल पद्धतीने कायदेशीर निविदा काढणार आहे, यावर आरबीआयचं नियंत्रण असेल. सीबीडीसीमुळे भारताच्या बँकिंग सिस्टमला फायदा होईल, असा अंदाज बांधला जातोय. याचा भारतीय बँकिंग व्यवस्थेला फायदा होईल, अशी शक्यता बांधली जात आहे. 
 
भारतामध्ये क्रिप्टो करन्सीवर जास्त टॅक्स लावण्यात आल्याचं म्हटले जातेय. एकप्रकारे हे खरेही आहे. भारतात क्रिप्टोवरील कर हा इतर कोणत्याही मालमत्तेवरील करापेक्षा खूप जास्त आहे. क्रिप्टोच्या तुलनेत भारतात शेअर्सवर 10 टक्के तर  शॉर्ट-टर्म कॅपिटल गेनवर 15 टक्के कर आकारला जातो.  

एक जुलै 2022 पासून भारतात क्रिप्टोकरेन्सीवर 30 टक्के कर आकारला जातोच, त्याशइवाय एक टक्के टीडीएसही आकारण्यात येतो. क्रिप्टो TDS वरील सर्व मार्गदर्शक तत्त्वे अधिक स्पष्ट करण्यासाठी, जूनमध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (CBDT) एक FAQ जारी करण्यात आली होती. काही जणांनी याला कारात्मक म्हटले तर काहींनी यावर टीका केली. 

'असोसिएशनचा एक भाग म्हणून, आम्ही मंत्रालयाला TDS च्या व्यावहारिक समस्यांबद्दल अवगत केले होते. त्याचाच आदर करत मंत्रालयाकडून टीडीएसची माहिती आणि टीडीएस गोळा करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत, असे क्रिप्टो एक्सचेंज युनोकॉइनचे सीईओ आणि सह संस्थापक सात्विक विश्वनाथ म्हणाले.' क्रिप्टोकरन्सी वापरणाऱ्यांसाठी हा एक छोटा विजय असेल, असे मी म्हणेल. अन्य विभागाकडूनही आम्हाला अशाच प्रोत्साहनाची आपेक्षा आहे. क्रिप्टो प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही जणांनी TDS चा व्यवसाय संधी म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला आहे, असेही विश्वनाथ म्हणाले.  

आमच्या ग्राहकांना TDS कपातीच्या बरोबर झटपट कॅशबॅक देऊन 100% TDS भार उचलू, असा निर्णय आम्ही घेतला आहे. ज्यामुळे या नियमाचे पालन करणे सोपे होईल, असे क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म WeTrade चे संस्थापक प्रशांत कुमार यांनी ABP Live ला सांगितले.  WeTrade क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणे सोपं आणि फायदेशीर होईल. याला  टीडीएस-मुक्त प्लेटफॉर्ममध्ये बदलण्याची आम्ही आपेक्षा करतो. त्यामुळे ग्राहकांना फायदा होईल, असेही प्रशांत कुमार म्हणाले.  

भारतामधील क्रिप्टोकरन्सीवरील कर खूप जास्त आहे, जो सामान्य लोकांसाठी ज्यांना क्रिप्टो मार्केटच्या अस्थिरतेची फारशी माहिती नसते, त्यांच्यासाठी कठीण आहे. भारतामध्ये अनेकांना अद्याप क्रिप्टोकरन्सीची संपूर्ण माहिती नाही. साध्या केवायसी प्रक्रियेमुळे आणि मोबाईल अॅपवर एक्सचेंज आणि वॉलेटची उपलब्धता, बँक खाते आणि सरकारी आयडी पुराव्यासह क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणे सोपे झाले आहे. क्रिप्टोकरन्सीवरील कठोर टॅक्समुळे   लोकांना त्यांच्या गुंतवणुकीबद्दल सावध राहण्यास मदत होते.  मोठ्या परताव्याच्या मोहासाठी अनेकजण क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात, त्यामुळे कधीकधी कष्टाचे पैसे जाण्याची शक्यता असते. त्यामुळेच सरकारकडून क्रिप्टोवर मोठ्या प्रमाणात कर लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Disclaimer: क्रिप्टो उत्पादने आणि NFTs अनियंत्रित आणि अत्यंत धोकादायक असू शकतात. अशा व्यवहारांमुळे होणार्‍या कोणत्याही हानीसाठी कोणतेही नियामक उपाय असू शकत नाहीत. क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता नाही. हे बाजारातील जोखमींच्या अधीन आहे. वाचकांना सल्ला दिला जातो की, यासाठी त्यांनी तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या विषयावरील महत्त्वाच्या साहित्यासह ऑफर दस्तऐवज काळजीपूर्वक वाचण करावे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding: लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृती मानधनाच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोर आली, तो प्रश्न अन् स्मृतीच्या उत्तराची चर्चा; म्हणाली, मला वाटत नाही...
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
Embed widget