Israel-Gaza : गाझामध्ये युद्धबंदी लागू, हल्ल्यात 15 लहान मुलांसह 43 लोकांचा मृत्यू, इस्त्राइल म्हणतंय...
Israel Gaza Ceasefire : इस्त्राइल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष पाहायला मिळत आहे. यानंतर आता तीन दिवसांसाठी युद्धविराम लागू झाला आहे.
Israel Gaza Conflict : इस्त्राइल (Israel) आणि पॅलेस्टिनी (Palestine) दहशतवाद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष पाहायला मिळत आहे. इस्त्राइल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यानंतर आता युद्धविराम लागू झाला आहे. तीन दिवसांसाठी युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये गाझामधील 43 जणांचा मृत्यू झाला आहे. युद्धविराम लागू झाल्यानंतर इस्त्राइल सैन्यानं म्हटलं आहे की, इस्त्राइलने गाझामधील इस्लामिक जिहादी संघटनांच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत.
इस्लामिक जिहादी संघटनांवर इस्त्राइलचा निशाणा
इस्त्राइलच्या सैन्यानं गाझावरील हवाई हल्ल्याबाबत म्हटलं आहे की, 'इस्त्राइलने क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे गाझामधील पॅलेस्टिनी दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केलं आहे. इस्त्राइलने गाझा पट्टीवरील इस्लामिक जिहादी संघटनांवर हल्ला केला.'
इस्त्राइलचा गाझावर एअरस्ट्राईक
इस्त्राइल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांमधील नव्या संघर्षाची सुरुवात शुक्रवारी इस्त्राइलने केली शुक्रवारी इस्त्राइलने गाझा पट्टीवर एअर स्ट्राईक केला. इस्त्राइलने गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला हमास संघटनेच्या एका वरिष्ठ सदस्याला अटक केली. यानंतर हल्ल्याचा धोका पाहता शुक्रवारी इस्त्राइलने गाझावर एअरस्ट्राईक केला. याआधी 2021 मध्ये इस्त्राइल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांमध्ये युद्ध झालं. हा संघर्ष 11 दिवस सुरु होता.
हल्ल्यात 15 लहान मुलांसह 43 लोकांचा मृत्यू
पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, पॅलेस्टिनी इस्लामिक दहशतवादांविरोधात (Palestinian Movement Islamic Jihad) इस्त्राइलने गाझावर एअरस्ट्राईक केला आहे. इस्त्राइलच्या हवाई हल्ल्यात 15 लहान मुलं आणि महिलांसह 43 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात सुमारे 300 जण जखमी झाले आहेत.
मागील 15 वर्षांपासून संघर्ष
पॅलेस्टाईनचा दहशतवादी गट असलेला हमास (Hamas group), इस्लामिक जिहादी संघटना आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष फार जुना आहे. इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या 15 वर्षांत चार युद्धे आणि अनेक किरकोळ चकमकी झाल्या आहेत. हमास आणि इस्रायल यांच्यात अलिकडच्या काळातील सर्वात भीषण लढाई मे 2021 मध्ये झाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Israeli Airstrikes : इस्त्राइलचा गाझावर पुन्हा एअरस्ट्राईक, पॅलेस्टाईन दहशतवाद्यांवर निशाणा, 24 जणांचा मृत्यू
- Israel Air Strike on Gaza : इस्त्राइलचा गाझावर एअरस्ट्राईक, हमास कमांडरसह 10 जणांचा मृत्यू